तेलंगाना व महाराष्ट्र राज्याचे निवडणूक ओळखपत्र काढून शासनाची दिशाभूल व दत्तक पुत्रांची मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न!

abhishek bakkewad
4 Min Read
Spread the love

 

तक्रारदाराच्या अर्जावर तहसीलदारांनी काढले कार्यवाहीचे आदेश

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – जिल्यातील धर्माबाद तालुक्यात लागतंच महाराष्ट्र सह तेलंगाना राज्याचे निवडणूक ओळखपत्र काढून शासनाची दिशाभूल करीत दत्तक पुत्राची मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न एका महिलेने केला असून त्या विरोधात तक्रार कर्ते आनंदा तुकाराम कुमारे राहणार पांगरी यांनी पुराव्यानिशी तक्रार दिल्यावरून धर्माबाद येथील तहसीलदार यांनी प्रभाग क्रमांक 148 च्या बी.एल. ओ.ला आदेश काढत योग्य कारवाई करण्याचे आदेशित केले आहे.

अर्जदार आनंदा तुकाराम कुमारे हे धर्माबाद तालुक्यातील पांगरी येथील रहिवासी असून त्यांच्या वडिलांचा भाऊ श्रावण लक्ष्मण कुंभारे म्हणजेच तक्रारकर्ते त्यांचे चुलते हे नगरपालिका धर्माबाद येथे जकात शिपाई या पदावर

 कार्यरत होते.

त्यांना पहिल्या पत्नीपासून फक्त एक मुलगी जन्मल्यानंतर त्यांची पहिली पत्नी मुलीसह चुलत्याच्या घरातून निघून गेली.आणि तेलंगाना राज्यातील भैंसा येथे जाऊन दुसरा विवाह करून तिथे संसार करू लागली. पहिली पत्नी व मुलगी सोडून गेल्यामुळे आपल्या चुलत्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था होत नसल्यामुळे त्यांनी दुसरा विवाह केला.पण त्यांना अपत्य होत नसल्यामुळे त्यांनी तक्रारकर्ते त्यांच्या वडिलांना विनंती करून माझ्या वृद्धाप काळातील आसरा म्हणून तुझ्या मुलास माझ्या ओटीत टाक असे म्हटल्यामुळे तक्रारकर्ते त्यांच्या वडिलांनी समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे तक्रारकर्ते त्यांचे वय दहा वर्षे असताना सन 1995 मध्ये तक्रारदारास दत्तक दिले. ते दत्तक पत्र लिहिताना धर्माबाद मधील ज्येष्ठ पत्रकार जी.पी. मिसळे हे सुद्धा होते असे तक्रारकर्ते त्यांचे म्हणणे आहे! तेव्हापासून तक्रार कर्ते आनंदा कुमारे हे आपल्या काकास वडील माणून त्यांच्याकडेच राहू लागले. आणि त्यांनी मुलाप्रमाणे त्यांचे पालन पोषण व पुढील शिक्षण केले.

काही वर्षानंतर चुलत्याच्या म्हणजेच दत्तक पित्यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी अरुणाबाई ही वयात आल्यामुळे तिचा विवाह तेलंगाना येथील गंगाधर झुलपेकर राहणार मुदगल मंडळ मुधोळ जिल्हा निर्मल तेलंगाना यांच्यासोबत लावून दिला. त्यानंतर तिचा विवाह झाल्यानंतर ती आमच्या चुलत्याशी काहीही संपर्क साधली नाही असे तक्रारदाराचे लेखी निवेदनात म्हणणे आहे.

कालांतराने तक्रारकर्ते त्यांचे दत्तक वडील दीर्घ आजारामुळे सन 1999 ला मरण पावले. तेव्हापासून तक्रार कर्ते आपल्या दत्तक आईचे जमल त्या पद्धतीने पालन पोषण केले. कालांतराने 10 सप्टेंबर 2023 रोजी आपल्या दत्तक आईचा मृत्यू झाल्यानंतर रीती रीवाजा प्रमाणे अंत्यविधी तक्रारकर्ते त्यांनी केला. तेव्हा देखील आपल्या दत्तक वडिलांच्या पहिली मुलगी अरुणाबाई हिचा काहीच संपर्क झाला नाही. परंतु नंतर तिला असे कळले की आपल्या वडिलांची पांगरी येथे शेत जमीन आहे व धर्माबाद येथील राम नगरात घर आहे‌ तेव्हा ती या सर्व मालमत्तेवर कब्जा करण्याच्या उद्देशाने खोटे कागदपत्र तयार करून स्वतःच्या नवऱ्याला भाऊ दाखवून इथे वेगळे निवडणूक ओळखपत्र तयार करून घेतले व इतरही लाभ शासनाचा लाभ घेतला.

सदरील महिला ही अरुणाबाई श्रावण कुंभारे महाराष्ट्रातील बनावट ओळखपत्राप्रमाणे व तेलंगानातील निवडणूक ओळखपत्र प्रमाणे अरुणाबाई गंगाधर झुलपेकर व तिचा पती गंगाधर झुलपेकर या दोघांनीही महाराष्ट्र व तेलंगाना राज्यातील वेगवेगळी निवडणूक ओळखपत्रे काढून शासनाची दिशाभूल करीत व शासनाचे लाभ घेण्याचे उद्देश मनाशी बाळगून आपल्या कधीही न संबंध ठेवणाऱ्या वडिलांच्या मालमत्तेवर जी मालमत्ता आज घडीला दत्तक पुत्र आनंदा तुकाराम कुमारे यांची व्हायला पाहिजे त्यावर हडपनीती अवलंबण्याचा प्रयत्न करीत असून त्या विरोधात योग्य ती कार्यवाही करण्याचे लेखी निवेदन आनंदा कुमारे यांनी पुराव्यानिशी दिले.

उपरोक्त निवेदन अर्जाची दखल तात्काळ तहसीलदार धर्माबाद यांनी घेत धर्माबाद येथील प्रभाग नंबर 148 चे बी एल ओ एस जी गैनवार यांच्या नावे आदेश काढत त्यांच्यावर नियमानुसार कडक कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

          *चौकट-*

धर्माबाद शहराच्या भोवती तेलंगाना सीमा असून जवळपास पाच 25 गावे तेलंगाना राज्यातील धर्माबाद बाजारपेठेची संलग्नित असून त्या गावातील बहुतांशी लोकांनी अशाच प्रकारे दुहेरी निवडणूक ओळखपत्र काढून व महाराष्ट्रातील म्हणजेच धर्माबाद मधील बऱ्याच जणांनी तेलंगाना राज्यातील दुहेरी निवडणूक ओळखपत्र काढून दोन्हीकडेही शासनाचे फायदे घेण्याचे षडयंत्र असण्याची शक्यता अनेक जानकारकांनी बोलून दाखवली असून त्या पार्श्वभूमीवर एक चौकशी समिती नेमण्याची मागणी होत आहे.

Share This Article
error: Content is protected !!