कोल्हापूर – कोल्हापूर विमानतळावरून कोल्हापूर ते तिरुपती या मार्गावर आठवड्यातून मंगळवार, बुधवार आणि रविवार अशा तीन दिवसात ही सेवा उपलब्ध असणार आहे.
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेली कोल्हापूर विमानतळावरून कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा आता पुन्हा सुरू होणार आहे. आजपासून (31 मार्च) ही सेवा पूर्ववत होणार असल्याने भाविकांसह पर्यटक, उद्योजकांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि तिरुपतीमधील बालाजी देवस्थानचा मोठा ऋणानुबंध आहे. दोन्हीकडे धार्मिक महत्त्व प्रचंड असल्याने या मार्गावर विमानसेवा पूर्वत करण्यात यावी, अशी मागणी सातत्याने प्रवाशांकडून होत होती. त्यामुळे आता ही सेवा सुरू झाल्याने पर्यटकांची मोठी सोय होणार आहे.