नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – नांदेड जिल्हा धर्माबाद शहरातील रेल्वे गेटवरील वाहतूक दर पंधरा मिनिटाला ठप्प होत असल्याचे दिसत असून दिवसा गणिक ही समस्या तीव्र होत असून या समस्येवर गेल्या अनेक वर्षापासून उपाययोजना न झाल्यामुळे नागरिकात तीव्र असंतोष पसरत आहे.
धर्माबाद नगरपालिका कार्यकक्षेत रत्नाळी धर्माबाद व बाळापूर असे तीन गाव येतात. व या तीनही गावला रेल्वेचे फाटक आहे.पण रेल्वेची वर्दळ आज घडीला एवढी वाढली आहे की दर पंधरा मिनिटाला रेल्वेचे फाटक बंद झाल्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असून धर्माबाद शहरातील रेल्वे गेट क्रमांक एक वर फाटक बंद केले तर एका मिनिटात थेट साईबाबा हॉटेलपर्यंत वाहतुकीची कोंडी होत आहे.
यासंदर्भात दैनिक हिंदूसम्राट प्रतिवर्षी आपल्या ठळक बातम्या द्वारे आवाज उठवला असला तरी रेल्वे फाटक बंद झाले तर पर्यायी व्यवस्था काय? या संदर्भात अद्यापही उपाययोजना झाली नाही व कुठला कृती आराखडाही नाही.
आज घडीला बाळापुर रेल्वे फाटकावरील उड्डाणपुलाचे काम चालू झाले असून तसेच काम बायपास उड्डाणपुलाचे रेल्वे गेट क्रमांक दोनच्या तब्बल एक किलोमीटर पलीकडे सुरू झाले आहे. पण सदरील काम पूर्ण होण्यास अजून किती वर्षे वाट पाहावी लागते ही कल्पनाच करवत नाही.
जो प्रमुख रहदारीचे रेल्वे फाटक आहे ते म्हणजे रेल्वे गेट क्रमांक एक. या रेल्वे गेटच्या संदर्भात मात्र आज घडीला कुठलाही कृती आराखडा शासनाकडे नसल्यामुळे दर पंधरा मिनिटाला वाहतूक ठप्प होत असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरत आहे.