चिलपिंपरी ते खुजडा येथील रस्त्यावरील खड्ड्यामुळे नागरिकांना करावे लागत आहे तारेवरची कसरत

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी/

 नांदेड – जिल्यातील मुदखेड तालुक्यातील मौजे चिलपिंपरी ते खुजडा कमीत कमी चार ते पाच किलोमीटर अंतराचा रस्ता असून या रस्त्यावरून ये जा करत असताना या भागातील समस्त नागरिकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ले मानला जाणारा मुदखेड तालुक्यातील हे गाव आहे. 

या भागातील लोकांनी येळी-महाटी पुलासाठी अगोदर मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यावेळी स्वतः अशोक चव्हाण गावागावांना जाऊन भेटी देऊन तुमच्या भागातील विकास करण्यासाठी मी सक्षम आहे असे बोलले होते. तेच नेते आता गावातील रस्त्यांची दैनिय अवस्था झालेली आहे. या भागातील विकास कामासाठी चव्हाण यांचे दुर्लक्ष झाला आहे असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. 

नांदेड ते धर्माबाद या मोठ्या रस्त्याचे काम चालू असल्यामुळे नांदेड जाण्यासाठी शॉर्टकट मार्ग म्हणून चिलपिपरी- महाटी या पुलावरून जाणारी रहदारी मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून या रस्त्यावरून खुजडा, टाकळी,चिलपिंपरी,हंगिरगा, ईळेगाव,भायगाव,रहाटी,मनुर या भागातील लोक मोठ्या प्रमाणात याच रस्त्यावरून जात आहेत. लोकांना असा प्रश्न पडत आहे की रस्त्यामध्ये खड्डे आहेत की खड्ड्यामध्ये रस्ता आहे.

 निवडणुकीच्या अगोदर सर्वच राजकीय नेते मोठे मोठे आश्वासना देतात प्रत्यक्षात मात्र काही करत नाहीत असं नागरिकांमध्ये बोलला जात आहे.प्रशासनांना विनंती आहे की नागरिकांना ये जा करण्यासाठी होणारा त्रास कशाप्रकारे कमी होईल याकडे जातीने लक्ष द्यावे.

Share This Article
error: Content is protected !!