पूर्ण क्षमतेने भरलेले मालगुजारी तलाव कोरडेठाक पडण्याच्या मार्गावर!

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – दि.१.जिल्यातील धर्माबाद तालुक्यात दोन वर्षापासून पूर्ण क्षमतेने भरणारे धर्माबाद तालुक्यातील संपूर्ण मालगुजारी तलाव सद्यस्थितीत कोरडे ठाक होत असल्याचे चित्र दिसत असून भविष्यात जनावरांना पिण्यासाठी पाणी नसणार हे भीषण वास्तव समोर येत आहे.

धर्माबाद तालुक्यात एकूण 38 मालगुजारी तलाव आहेत.

 सदरील बहुतांशी तलावांचे गाळ काढून खोलीकरण केलेले असून गेल्या दोन वर्षापासून मुबलक पाऊस पडल्यामुळे सदरील तलाव पूर्ण क्षमतेने भरत होते व एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंतही या तलावात मुबलक पाणीसाठा राहत होता.पण सद्यस्थितीत मार्च महिना संपत आला तेव्हा तालुक्यातील बहुतांशी मालगुजारी तलावातील पाणीसाठा आटत चालला असून येत्या 4-8 दिवसातच ते कोरडे ठाक पडणार असून जनावराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Share This Article
error: Content is protected !!