श्री माऊली जगन्नाथ बाबा कृपेने भव्य पायीवारी दिंडी

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

गोल्ला गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे कर्मचारी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष मा. श्री. अनुप अन्नमवार यांच्या कडून भाविक भक्तांना अन्नदान

 जिल्हा प्रतिनिधी /राहुल कोलत

नांदेड – ता.वढा जि. चंद्रपुर ते पंढरपूर मार्गे उनकेश्वर, माहुर शेकडो भाविक भक्त ‘माऊली’ दिंडीत सहभागी होऊन विठ्ठल नामाचा गजर करत विठ्ठलाच्या सेवेमधे पंढरपुराकडे रवाना होत आहे.

 दरवर्षी प्रमाने याही वर्षी दिंडी याचं मार्गाने उनकेश्वर येथे स्वर्गवासी भुमन्ना अन्नमवार यांच्या समाधीला दि. 25 मार्च 2024 सोमवार रोजी सकाळी 9 वाजता दिंडीचे स्वागत करण्यात आले आहे.गोल्ला गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे कर्मचारी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष मा. श्री. अनुप अन्नमवार यांचे बंधु सामजिक कार्यकर्ते मा.श्री. शंकर अन्ना अन्नमवार व डॉ.सौरव शंकर अन्नमवार रा. लिंगी, ता.किनवट. या परिवारातर्फे भाविक भक्तांना अन्नदान म्हणून खिचडी व नाष्टा चहा फराळ पाण्याची चांगल्या प्रकारे व्यवस्था केली. याप्रसंगी सर्वच भाविक भक्तांचे स्वागत करण्यात आले.

Share This Article
error: Content is protected !!