विद्यार्थी काँग्रेसच्या शहर अध्यक्ष पदी शुभम जक्कलवाड तर तालुका सचिव पदी एकनाथ काईतवाड यांची निवड!

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 हिमायतनगर ता. प्रतिनिधी/जरगेवाड बाबाराव

हिमायतनगर : तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे अनेक पदाच्या निवडी सध्या चालू असुन हिमायतनगर येथील विद्यार्थी काँग्रेसच्या (NSUI) पदी तालुक्याचे लाडके व विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचा नेतृत्वाखाली व विद्यार्थी काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष शशिकांत क्षिरसागर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन यांची निवड करण्यात आली आहे.निवडीनंतर बोलतांना शुभम जक्कलवाड यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास कसा साधता येईल यांच्यावर आपले सखोलपणे विचार मांडले आहेत. माझे कार्य करतांना विद्यमान आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांचा विश्वासाला कोठलाही तडा जाऊ देणार नाही व देलेल्या पदाचा योग्य वापर करून योग्य भूमिका बजावेल आसे जाहीर पणे नमूद केले आहे.
निवडी करतांना विद्यार्थी काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष किरण पडलवार, विद्यार्थी काँग्रेस चे जिल्हा सरचिटणीस वैभव शिंदे,यूवक काँग्रेस चे हदगाव -हिमायतनगर विधानसभा सरचिटणीस शेख मुखिद खडकीकर आदी जन उपस्थित होते.


गोल्ला गोलेवार समाजातील यूवकांनी सर्वच क्षेत्रात हिरेरीने समभाग नोंदवावा व आपल्या समाजाचे व आई वडीलांचे नाव लौकीक करावे,तसेच माझ्या समाजातील यूवकांना सर्वच क्षेत्रात खेचून आणण्याचा मि सदैव प्रयत्न करीन असे स्पष्ट मत गोल्ला-गोलेवार यादव महासंघ संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भुमना आकेमवाड यांनी अभिनंदन करतांना म्हणाले.

Share This Article
error: Content is protected !!