मुदखेड प्रतिनिधी /राहुल कोलते
मुदखेड – तालुक्यातील मौजे माळकौठा येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण माळकौठा मध्ये भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ माळकौठा येथील कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी साठी आले असता अनेक मराठा बांधव एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी केली.अगोदर आरक्षण मगच इलेक्शन, एक मराठा लाख मराठा, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा अनेक घोषणाबाजी करत माळकौठ्या त्यांना हाकलून दिले.
अनेक गावागावा मधून मराठा बांधव आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेक राजकीय नेत्यांना गावामधून सळो की पळो करून सोडत आहेत असे चित्र दिसून येत आहे. प्रत्येक मराठा बांधव यांना राजकीय नेत्यांची मनामध्ये चिड असल्याचे आजच्या दृश्यातून दिसून आले आहेत.