नांदेड प्रतिनिधी/अशोक वाघमारे
नांदेड -विश्वरत्न प.पु.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळ घुंगराळा अध्यक्षपदी दिपक गजभारे तर,सचिवपदी सचिन गजभारे यांची सर्वानूमते निवड करण्यात आली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येत्या २९ एप्रिल रोजी दरवर्षीप्रमाणेच यंदाही घुंगराळ्यात धार्मिक,विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येणार असून त्यानुषंगानेच भिमजयंती मंडळाची यंदाची कार्यकारिणी पूनर्गठित करण्यासाठी उरुवेला बुद्ध विहारात नूकतीच बैठक घेण्यात आली.त्यात अध्यक्षपदी दिपक माधवराव गजभारे व सचिवपदी सचिन रमेश गजभारे यांची सर्वानूमते निवड करण्यात आली.
उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्ष-उत्तम गजभारे, कोषाध्यक्ष-रमेश आढाव, सहकोषाध्यक्ष-भुजंगा गजभारे तर,सदस्यपदी माधव अमृता गजभारे, प्रफुल्ल गायकवाड, , सिद्धोधन पट्टेकर यांची निवड करण्यात आली.
नवनियुक्त कार्यकारिणीचे सर्वस्तरातून स्वागत व अभिनंदन होत आहे.
या बैठकीला पोचीराम गजभारे, हौसाजी गजभारे, अमृता गजभारे, गणपत गजभारे, कोंडीबा गजभारे, निवृत्ती आढाव, प्रकाश गजभारे, एस.के.गजभारे, भिमराव गजभारे, मिलिंद गजभारे, कपिल गजभारे, अच्युत सोनसळे, गंगाधर गजभारे, रावसाहेब गजभारे, परबता हनमंते, बबन ढवळे, साहेबराव गजभारे, पुंडलिक आढाव, माधव गजभारे, अनिल गजभारे, चंद्रकांत कागडे, सिद्धार्थ ढवळे, कुणाल गजभारे, धम्मपाल ढवळे, सिद्धार्थ आढाव, रोहीत आढाव, नागेश गजभारे, कुलदीप आढाव, राजरत्न गजभारे श्री.सोनसळे, महेश गजभारे, यश गजभारे, हर्स सोनसळे, हौसाजी भेरजे, यांच्यासह बौद्ध उपासक उपासिका यांची बहुसंख्य उपस्थिती होती….