शिक्षण विस्तार अधिकारी चिकलवाड रावण मारोती यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ संपन्न.

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

संपादक /अभिषेक बकेवाड 

नांदेड – नायगाव पंचायत समिती येथे शिक्षण विभागा तर्फे शिक्षण विस्तार अधिकारी तथा प्रभारी गट शिक्षण अधिकारी श्री. चिकलवाड रावण मारोती सर यांनी वयाची 38 वर्ष शिक्षण क्षेत्रात घालवले आहे मुक्काम पोस्ट कहाळा खुर्द तालुका नायगाव येथील रहिवासी असून सहशिक्षक म्हणून सुरुवात त्यांची केंद्रीय प्राथमिक शाळा वानोळा ता. किनवट इथून सुरुवात केली आहे त्यांनी तिथे पाच वर्ष सेवा केली. बिलोली येथे सात वर्ष सेवा केले. उमरी तालुक्यातील राव धानोरा येथे २ वर्ष सेवा केली. नायगाव तालुक्यातील हिप्परगा, कोलंबी भोकर तालुक्यातील दिवशी माहूर तालुक्यातील आष्टी अशा अनेक गावांमध्ये त्यांनी केंद्रप्रमुख यांची चांगल्या प्रकारे भूमिका निभावली पुढे जाऊन त्यांची पदोन्नती होऊन शिक्षण विस्तार अधिकारी या पदावर असताना आज त्यांचा सेवा निवृत्तीचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.माझे मामासासरे यांचा सेवा निवृती निरोप समारंभ कार्यक्रम झाला त्यांच्या कार्य काळाची उजळी देत सर्वांनी मनभरून अधिकारी मधला देव माणूस आम्ही पहिला व आम्हा सर्वाना त्यांनी विविध उपक्रमा मध्ये प्रशिक्षित करून अतिशय प्रेमाने आमच्यकडून काम करून घ्याचे कधीही त्यांनी आम्हास दुखावंले नाही अशी स्तुथी सुमने पुष्प रुपी शब्दामधून सर्व शिक्षण विभाग अधिकारी पद अधिकारी केंद्र प्रमुख व सर्व शिक्षकांनी त्यांचा मानसन्मान परिवारासह करून त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आम्हा सर्व परिवारला दिल्या. त्याबद्दल सर्व शिक्षण विभागाचे खूप खूप आभार धन्यवाद 🙏🏻🙏🏻

Share This Article
error: Content is protected !!