प्रतिनिधी/लक्ष्मण भैरेवाड
हिमायतनगर – जि.प.प्रा. शाळा बोरगडी ता. हिमायतनगर जि. नांदेड या वर्षी घेण्यात आलेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये चांगले गुण घेऊन प्रवेश पात्र झालेली जि.प.प्रा. शाळा बोरगडी शाळेची विद्यार्थीनी कु.साक्षी संतोष काईतवाड तिने अतिशय मेहनतीने अभ्यास करून नवोदय परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. तिचे आई-वडील श्री. दगडूजी काईतवाड( आजोबा ) यांचा कु. साक्षी हिचा शाळेच्या वतिने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच शामराव राठोड, सुधाकर काईतवाड, मुख्याध्यापक श्री.शिरगिरे सर व सर्व शिक्षक आणि गावातील शिक्षण प्रेमी नागरिक बांधव मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते.