निवडणुकी काळातच आश्वासनाची खैरात ; पुढील पाच वर्ष मागासवर्गीयांचा विसर

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

मन्नेवारलू व महादेव कोळी जमाती प्रमाणपत्र द्यावे,राजकीय पोळी भाजण्यासाठी मागासवर्गीयांचा वापर

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड :यंदाच्या निवडणूक प्रचारात अनुसूचित जमाती मन्नेरवारलु व महादेव कोळी संवाद मेळाव्याचे आयोजन करणार. मागच्या निवडणुकीत सुद्धा असेच मेळावे भरविण्यात आले होते आणि त्यात आश्वासनाची खैरात देण्यात आली होती, नेहमीच मागासवर्गीयांच्या कोपऱ्याला गूळ लावण्याचे काम या राजकारण्यांनी करत आलेले आहेत आणि करतच असल्याचे युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉ लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी म्हटले आहेत.

उच्च शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी किती यातना भोगावे लागत आहेत याचा विचारही मायबाप जनतेने करावे. पाच वर्षा पासुन मन्नेवारलू व महादेव कोळी जमाती बद्दल कोणत्याही नेत्याला पुळका आला नाही व आज निवडणुकीच्या तोंडावर स्वतःची पोळी भाजण्यासाठी समाजाचा एवढा पुळका कशासाठी असा संतप्त सवाल युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉ लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी केले आहेत.

 

समाजाचे वरिष्ठ नेते मंडळी तरी यावर सकारात्मकता दाखवून समाजाच्या उद्धारासाठी एक पाऊल पुढे येण्याची नितांत गरज आहे. आपल्या स्वार्थासाठी समाजाला कोणत्याही पक्षाच्या दावणीला बांधले जात असल्याचे दिसून येत आहे. मागच्या निवडणुकीत दिलेले आश्वासनाची पूर्तता झाली आहे का? याचाही सखोल विचार करावा. आश्वासन दिले होते त्या आश्वासनाचे काय झाले हा प्रश्न त्यांना विचारणार कोण? आजपर्यंत त्यांनी समाजाबद्दल काय भूमिका घेतली हे सर्वानाच माहिती आहे. संवाद मेळावे भरल्याने न्याय मिळत नसतो तर त्यासाठी त्याचा पाठपुरावाही करण्याची गरज आहे. गरीब कुटुंबातील सुशिक्षित बेरोजगार हे बेरोजगार रागात आहेत, अधिकाऱ्यांचे पोरं अधिकारी होत आहेत. मग कुठे समाजात एकोपा आहे. मागासवर्गीयांचा विकास करू असे वल्गना करणारे नेते तर पुढील निवडणुकी पर्यंत तरी दिसत नाहीत. कोणत्या आमदाराने व खासदारांनी कुठल्यातरी मतदारसंघात मन्नेरवारलु महादेव कोळी या जमातीचे जातीचे प्रमाणपत्र तसेच वैधता प्रमाणपत्र सुरू करण्यास तिथल्या एसडीएम ला सांगितले किंवा त्यांच्याबरोबर बैठक घेतली का? प्रमाणपत्र सुरू करण्यास भाग पाडले असे झाले आहे काय? त्यासाठी प्रयत्न केले आहेत काय? हा प्रश्न सर्व समाजबांधवांनी विचार करण्याची गरज आहे.

उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असूनही वैधता प्रमाणपत्र देत नसल्याने कारणाने अनेक जण मुकावे लागत आहे. अनेकांच्या पदोन्नती रोखून ठेवले आहेत, पेन्शन मंजूर केल्या जात नाही. मग का आणि कुणासाठी मतदान करायचे. आपण विरोध कुठल्याच पक्षाला करायचं नसून पण जो समाजासाठी झिजनार आहे आणि त्यांना न्याय मिळवून देणार आहे अशाच उमेदवाराला मतदान करावे आणि मतदानही 100% टक्के झाले पाहिजे, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉ लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी म्हटले आहेत.

Share This Article
error: Content is protected !!