17 वर्षापासुन फरार आरोपीस केले जेरबंद…
प्रतिनीधी/माधव काईतवाड
हिमायतनगर :-पोलीस स्टेशन अंतर्गत मागील 17 वर्षापासुन फरार आरोपीस शिताफीने अटक केली.याबाबात सविस्तर वृत्त असे की गु.र.न.63/2006 कलम 394,353,332,326,504,506,34 भा.द.वी सह कलम 26 क 41 वन अधिनियम मधील आरोपी रेड्डी राजेन्ना राजनवार रा.जामगाव (तेलंगाना)ह.मु .बेलगाव तेलंगाना. यास पोलीस निरीक्षक श्री.जह्राड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस वारंट अंमलदार बालाजी हा.काईतवाड. होमगार्ड ज्ञानेश्वर मेंडेवाड यांनी तेलंगनातुन मागील 17 वर्षापासुन फरार आरोपीस मोठ्या शिताफिने अटक करुन सत्र न्यायालय भोकर येथे हजर केले.
व न्यायालयाने त्यास 12/4/2024 पर्यंत कारागृहात बंदी करण्याचे आदेश दिले .या सर्व कामगिरीबद्दल नांदेड जिल्हा पोलीस अधिक्षक कोकाटे साहेब पोलीस उप अधिक्षक डॅनीयल बैन साहेब यांच्यासह पोलीस विभागात सर्वाकडुन या कामगिरीचे कौतुक व अभिनंदन केल्या जात आहे