नांदेडमध्ये एकूण ९२ अर्ज दाखल
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड:दि.५.एप्रिल लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजच्या शेवटच्या दिवशी ७२ अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत एकूण ९२ अर्ज दाखल झाले असल्याची जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी माहिती दिली आहे.
अर्जाची छाननी ५ एप्रिलला सकाळी ११ वाजतापासून सुरू होईल. अर्ज ८ एप्रिलपर्यंत मागे घेता येईल. ८ तारखेला अंतिम उमेदवार निश्चित होईल.
*शेवटच्या दिवशी दाखल उमेदवार*
आज दाखल झालेल्या अर्जामध्ये हरी पियाजी बोयाळे ( बहुजन भारत पार्टी ), सय्यद तनवीर (बहुजन महा पार्टी ), रुक्मिणीबाई शंकरराव गीते (भारतीय प्रजा सुराज्य पक्ष ), अब्दुल रहीम अहमद (देश जनहित पार्टी ), चिखलीकर प्रतापराव गोविंदराव (भाजप ), कौसर सुलताना (इंडियन नॅशनल लीग ) अविनाश विश्वनाथ भोसीकर (वंचित बहुजन आघाडी ), मोहनराव आनंदराव वाघमारे (बहुजन मुक्ती पार्टी ), आनंदा धोंडीबा जाधव (मराठवाडा मुक्ती मोर्चा ), सुशीला निळकंठराव पवार ( समनक जनता पार्टी ), दिगंबर धोंडीबा वाघमारे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ), पांडुरंग रामा अडगुळ वार (बहुजन समाज पार्टी ), शाहरुख खमर (बहुजन महा पार्टी ) व अपक्ष उमेदवारांमध्ये कल्पना संजय गायकवाड, प्रमोद किसनराव कामठेकर , साहेबराव नागोराव गुंडीले, अरुण भागाजी साबळे, युनिस खाँ युसुफ खाँ, ज्ञानेश्वर रावसाहेब कपाटे, लतीफ उल जाफर कुरेशी, फहाद सलीम शेख सलीम शेख, थोरात रवींद्र गणपतराव, मोहम्मद इलियाज अब्दुल वहिद मोहम्मद, इरफान फारूक सईद, मोहम्मद मुबीन शेख पाशा, अमजद खान सखर खान, अहमद खालिद अहमद रफीक, मोहम्मद सलीम मोहम्मद इकबाल, मोहम्मद नदीम मोहम्मद इक्बाल, राठोड सुरेश गोपीनाथ, मोहम्मद तौफिक मोहम्मद युसुफ, अलीमोद्दीन मोहियोद्दीन काझी सय्यद, रमेश दौलती माने, एडवोकेट विजयसिंह चव्हाण, शेख इमरान शेख पाशा, जुल्फेखान जिलानी सय्यद, विजयमाला गजानन गायकवाड, एडवोकेट मारोतराव कान्होबाराव, हुक्के पाटील, देविदास गोविंदराव इंगळे, भास्कर चंपतराव डोईफोडे, वैशाली मारोतराव हुके पाटील, गजानन दत्ताराम धुमाळ ,अकबर, राहुल सूर्यकांत एगंडे, माधवराव मुकिंदा गायकवाड, सुरेश दिगंबर कांबळे, नागेश संभाजी गायकवाड, अश्फाक अहमद, मज्जिद अ अकबर, युनूस खान,खान अलायार युसुफ खान, आनंदा कुंडलिकराव बोकारे, शिवाजी दत्तात्रय गायकवाड, निखिल लक्ष्मणराव गर्जे, ज्ञानेश्वर बाबुराव कोंडामंगले सोपान नवेल पाटील यांचा समावेश आहे. यामध्ये अनेक उमेदवारांनी एकापेक्षा अनेक अर्ज दाखल केले आहे.
बुधवारी दाखल झालेले अर्ज
बुधवार पर्यंत एकूण १९ उमेदवारांनी २० अर्ज दाखल केले होते. यामध्ये लक्ष्मण नागोराव पाटील (अपक्ष ) तुकाराम गणपत बिराजदार (अपक्ष )वसंतराव बळवंतराव चव्हाण (इंडियन नॅशनल काँग्रेस ) अविनाश विश्वनाथ भोसीकर (वंचित बहुजन आघाडी ) शेख मोईन शेख रशीद (ऑल इंडिया मजलिस ए इन्कलाब ए मिल्लत,) मोहम्मद वसीम (अपक्ष ) मोहम्मद सिद्दीकी शेख संदलजी (अपक्ष ) भास्कर चंपतराव डोईफोडे .(अपक्ष ) असलम इब्राहिम शेख (अपक्ष )
मंगळवारपर्यंत दाखल अर्ज
मंगळवारपर्यंत चिखलीकर प्रतापराव गोविंदराव ( भारतीय जनता पार्टी ) विष्णू मारुती जाधव (राष्ट्रीय किसान पार्टी ) जगदीश लक्ष्मण पोतरे (अपक्ष ) कदम सुरज देवेंद्र (अपक्ष ) नागोराव दिगंबर वाघमारे (अपक्ष ) नय्यर जहाँ मोहम्मद फेरोज हुसेन (अपक्ष ) वसंतराव बळवंतराव चव्हाण(इंडियन नॅशनल काँग्रेस ) महारुद्र केशव पोपळाईतकर (अपक्ष )अकबर अख्तर खॉन ( अपक्ष )साहेबराव भिवा गजभारे( अपक्ष ) जफर अली खाँ मेहमूद अली खाँ पठाण (अपक्ष ) यांनी अर्ज दाखल केले होते.