नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद नांदेड येथे स्टाफ नर्स पदासाठी अनेक भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत,परंतु ज्यांना शासकीय अनुभव कमी आहे किंवा अनुभव नाही अशा उमेदवारांची निवड केली जाते, ज्या उमेदवारांना शासकीय अनुभव चांगलं असुनही त्यांना साधं प्रतिक्षा मध्ये पण नावे नसतात, हि खुप खेदाची बाब आहे.
म्हणूनच याअगोदर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना तक्रार केली त्यांनी भरती प्रक्रिया बरोबर करण्यात आले असे सांगण्यात आले, बोगस भरतीला सिद्ध करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे अधिकारी शिंगारे यांना माहिती विचारली असता, टाळाटाळ उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली आहेत.
म्हणून तक्रारदारांनी थेट जिल्हाधिकारी साहेबांकडे फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे, कोणत्या उमेदवारांना किती अनुभव, किती टक्केवारी सर्व निवेदनात नमुद केले आहे.
तक्रारी करुन न्याय मिळत नसेल तर जिवास बरे वाईट झाल्यास जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक जबाबदार राहतील असे माध्यमांशी सांगितले आहे.