कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणाने,वसंतराव चव्हाणांना निवडून आणा

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 2024 नांदेड लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात राजकीय उलथा पालथ झाली.

नांदेड जिल्हा/प्रतिनिधी/

नांदेड – मा.मुख्यमंत्री धर्मनिरपेक्ष नेते अशोकराव चव्हाण साहेब यांच्या मानेवर तलवार ठेवून भाजपाने त्यांना आपल्यात प्रवेश दिला. 2019 च्या लोकसभेत ज्यांच्या कडून त्यांचा मानहानिकारक पराभव झाला आज त्याच प्रताप पाटलांना निवडून आणण्याची जबादारी त्यांच्याकडे देण्यात आली.

 

 यावरून रजाकराचे दिवस आठवायला लागले “मारून मुसलमान करणे” अशी अवस्था अशोकराव चव्हाण यांची करण्यात आली. अशोकराव चव्हाण वैयक्तिक रित्या जरी घाबरले असले तरी जनता मात्र या गोष्टीला भीक घालणार नाही अशा चर्चा लोकसभा मतदारसंघात होत आहे.

 

 नांदेड जिल्ह्यातील माजी मुख्यमंत्री, माजी मंत्री,माजी खासदार, विद्यमान खासदार, विद्यमान चार आमदार या बलाढ्य शक्तीच्या विरोधात सर्वसामान्य कुटुंबातील जनतेच्या सहवासातील नेते म्हणून वसंत चव्हाण लढा देण्यासाठी तयार आहेत .

 

वचनास कटिबद्ध म्हणून ओळख असणारे नायगाव येथील बळवंतराव चव्हाण परिवार त्याच परिवारातील वसंत चव्हाण हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढववत असल्यामुळे जनतेच्या मनातून स्पष्टपणे “प्रामाणिकपणाने वसंत चव्हाण यांना निवडून आणा” असा सूर ऐकायाला मिळत आहे.

 

 नांदेड जिल्ह्यातील नेते मंडळी एका बाजूला आणि सर्व सामान्य जनता वसंत चव्हाण यांच्या बाजूने असे चित्र जिल्ह्यात दिसत आहे वसंत चव्हाण प्रामाणिक राजकीय व्यक्ती म्हणून परिचित आहेत तीन दशक आमदार राहिलेल्या स्वर्गीय बळवंतराव यांच्या परिवारातील ते सदस्य आहेत त्यांच्या या राजकीय कारकीर्द त्यांनी प्रामाणिकपणे समाजसेवेचा वसा घेऊन राजकारण करत आहेत.आज काँग्रेसच्या अतिशय पडझडीच्या काळात जनतेच्या विश्वासावर काँग्रेस पक्षाकडून लोकसभा उमेदवार म्हणून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत निवडणुकीला सामोरे जात असताना मतदार संघातील सामान्य जनता मात्र स्पष्टपणे त्यांच्या बाजूला आहे असे चित्र दिसत आहे.तर सर्व अवैध व्यवसायिक , हिंदू खतरे मे हे असे म्हणणारे हिंदूंचे ठेकेदार प्रतापराव यांच्या बाजूने दिसत आहेत

Share This Article
error: Content is protected !!