आम्हाला रेल्वे नको मेट्रो नको विमान नको आम्हाला डांबरी रस्ता तरी सुरळीत हवा तेव्हाच मतदान करणार.

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

अहेरी उपविभागातील नागरिक त्रस्त.

आलापल्ली शहर प्रतिनिधी: शंकर मुत्येलवार:

आलापल्ली – अहेरी एकीकडे देशात मेट्रो बुलेट ट्रेन रेल्वे विमान धावत आहेत समृद्धी महामार्ग सारखे रस्ते बनत आहेत मात्र गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागातील नागरिकांना या सर्वांचे अपेक्षा नाही सध्या डांबरी रस्त्याचे अपेक्षा आहे मात्र ही अपेक्षा सुद्धा पूर्ण झाली नाही.

 आलापल्ली आष्टी मार्ग आलापल्ली मुलचेरा मार्ग आष्टी लगाम मार्ग दामपूर तमरगुंडा कोलपल्ली कोठारी मलेरा कोपरल्ली मुलचेरा मार्गाची प्रचंड दुरावस्था झाली आहे सुरजागड लोह प्रकल्पातून दररोज चालणाऱ्या शेकडो ट्रकामुळे तीन-चार वर्षांपासून आलापल्ली आष्टी मार्गाची दुरवस्था झाली आहे या खराब रस्त्यामुळे नागरिक पर्यायी मुलचेरा मार्गाने आष्टीला पोहोचत होते मात्र आता तोही रस्ता खराब झाला आहे त्यामुळे खड्डेमय रस्त्यातून प्रवास चंद्रपूर गडचिरोली घाटावा लागत आहे खडेड्मय रस्त्यामुळे अनेक नागरिकांना आतापर्यंत आपले जीव गमावा लागलं आहे . रुग्णवाहिकेतून जाणाऱ्या अनेक रुग्णांना जीव गमावा लागला आहे खराब रस्त्यामुळे एसटी बस भंगार झाले आणि वेळेवर बस सुटत नाही त्यामुळे अनेक नागरिकांनी चार चाकी वाहन खरेदी केले आहेत. त्याचे वाहन ही भंगार बनत आहे चार चाकी एवरेज कमी देत आहे आणि अलाइनमेंट खराब होत आहे. आलापल्ली ते आष्टी जाणाऱ्या प्रवाशांना अनेक प्रकारे त्रास सहन करावा लागत आहे .

आलापल्ली वरून चंद्रपूर अडीच ते तीन तास लागतात आलापल्ली ते गडचिरोली जाण्यासाठी चार ते पाच तास लागतात.

 

     अनेकांनी खराब रस्त्यामुळे लग्न वधूकडे न करता अहेरी करणे पसंत केले आहे. या मार्गाचे काम लवकर करावी अन्यथा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अहेरी विभागातील जनता मतदान करणार नाही.अशी मागणी होत आहे.

Share This Article
error: Content is protected !!