गुत्तेदाराची झाले चांगभले तर अभियंते झाले मालामाल ……
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – इस्लापूर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून किनवट तालुक्याचे आमदार भीमराव केराम यांनी राज्य शासनाकडे मोठ्या प्रमाणात वजन खर्ची करून कोट्यावधी रुपयांची विकासात्मक कामे किनवट माहूर विधानसभा मतदारसंघात खेचून आणली.त्याचबरोबर इस्लापूर ते कोसमेट या पाच किलोमीटर रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या ठिकाणी अंदाजपत्रक यानुसार प्रत्येक्षात काम केल्या जात नसल्याने इस्लापूर वासियांच्या पदरी पुन्हा घोर निराशा आली.इस्लापूर शहरांचा सर्वांगीण विकास व्हावा.व इस्लापूर नाका ते रेल्वे स्टेशन दरम्यानच्या दोन किलोमीटर रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात यावे व शहराच्या सौंदर्यात भर पडावी व शहरांच्या विकासाला चालना मिळावी म्हणून शासनाचा निधी या ठिकाणी देण्यात आला.पण प्रत्यक्षात शहरातील या दोन किलोमीटर अंतर्गत च्या रस्त्यामध्ये संबंधित गुत्तेदारांनी जुन्या राज्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे खोदकाम न करता दबई न करता थेट गिट्टीचा थर अंथरून त्या रहदारीच्या मुख्य रस्त्यावर डांबरीकरण करण्यास सुरुवात केली व प्रत्यक्षात एक पेअर हा या गुत्तेदारांनी या कामांमध्ये वाचवला.साईट पट्ट्याची भरणी न करता लाखो रुपये या कामांमध्ये वाचण्यात आले. त्यातच या कामावर नेमण्यात आलेल्या कुठल्याही अभियंत्यांनी या कामाकडे लक्ष दिले नाही त्यामुळे सदरील काम हे मार्च एंड च्या नावाखाली गुत्तेदारीने बोगस रीत्या करण्याचा सपाटा लावला असल्याची विदारक व भयावाह चित्र इस्लापूर परिसरातील जनतेला पहावयास मिळत आहे.
त्यातच शहरात असलेल्या अतिक्रमणाच्या नावाखाली या गुत्तेदारांनी पद्धतशीरित्या रस्ता अरुंद करण्यास सुरुवात केली व अंदाजपत्रकांना बगल दिली.व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा या संपूर्ण बाबीकडे डोळेझाक केली असल्याने झारीतल्या शुक्राचार्याची भूमिका संबंधित खात्याचे अधिकारी व अभियंते निभावत आहेत की काय ॽ अशी शंका निर्माण होणे परिसरातील सुज्ञ नागरिकास साहजिकच आहे.
त्यामुळे विकासात्मक कामाच्या नावाखाली शहराच्या विकास खुंटला असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.विशेषता सदरील मुख्य रस्ता हा सहस्रकुंड पर्यटन स्थळाला जोडणारा व इस्लापूर शहराच्या बाजारपेठेतून जाणारा असल्याने व या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी होत असल्याने रस्त्यावर नेहमी अपघाताचे प्रमाण वाढलेले असते.व वाहतुकीला खोळंबा निर्माण होतो .ही बाब लक्षात घेऊन या रस्त्याच्या आजूबाजूचे अतिक्रमणे हटवणे संबंधित खात्याला गरजेचे होते. पण संबंधित खात्याने या बाबीकडे जाणून बुजून दुर्लक्ष केली त्यातच शहराच्या विकासात चालना मिळण्याऐवजी शहराचा विकास खुंटला जात असल्याचे मत जाणकाराकडून ऐकावयास मिळत आहे.
त्यातच लोकसभेच्या निवडणुका लागल्याने लोकप्रतिनिधींनी सर्व बाबीची माहिती असताना सुद्धा जाणून-बुजून या बाबीकडे दुर्लक्ष केल्याचे पहावयास मिळत आहे. अतिक्रमण काढल्यास याचा फटका येत्या लोकसभा व विधानसभेला बसतो की काय ? याची सुद्धा भीती आता राजकीय मंडळीला पडू लागली आहे.
संबंधित दोन किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाची गुणनियंत्रण कक्षाकडून तपासणी करण्यात यावी अशा स्वरूपाची मागणी आता पर्यटकाकडून समोर येत आहे.