नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ अशोक वाघमारे
नांदेड नायगाव तालुक्यातील मौजे राहेर येथे गेल्या अनेक महिन्यापासून होत असलेल्या उत्खनावर अखेर नायगाव येथील तहसीलदार मा.धम्मप्रिया गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अवैधरेती उत्खनन करणारी सर्व साहित्य प्रतिबंधक पथकाने जप्त केली आहे.
मौजे राहेर येथे दिनांक 7/ 4/ 2024 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास गोदावरी नदी पात्रातून राहेर येथे वाळू माफियांनी गेले अनेक महिन्यापासून वाळू उपसा करीत होते आणि ही अवैध्य वाळू बोटीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस उत्खनन करून ती परस्पर नायगाव परिसरात रात्री बे रात्री नेत असे मात्र राहेर येथील अवैध वाळू उत्खन करणाऱ्या माफी यांना नायगाव च्या कर्तव्यदक्ष व धाडसी तहसीलदार यांनी चांगलाच धडा शिकवत त्यांच्यावर गणिमी कावा करून अखेर त्यांना लगाम घालून त्यांचे सर्व साहित्य जप्त केले आहे.
सदर रेती व्यवसायिकानी गेले अनेक महिन्यापासून अवैध रेती उत्खनन करून रातोरात ती रेती परस्पर नेण्याचा मोठा सफाटा सुरू केला होता. आणि यामुळे नवीन होत असलेले रस्ते व झालेले रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था होत होती वाळू माफियाने गेले अनेक महिन्यापासून अवैध रेती उत्खन करून अवजड वाहणाने नवीन रस्त्यावरून वाहतूक सुरू ठेवली होती या अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांचा चकणा चोर व रस्त्यांची दुरवस्था होताना दिसून येत होती राहेर येतील वाळू व्यवसायिकांनी हम बोलो सो कायदा म्हणत मोठ्या जोमामध्ये अवैध रेती उत्खन करून ते रेती परस्पर पार्सल करत होते. अखेर या अवैध्य वाळू व्यवसायिकांना माननीय तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी चांगला धडा शिकवीत त्यांच्यावर मोठी कारवाई व त्यांचे सर्व साहित्य जप्त करून नायगाव येथील तहसील कार्यालयामध्ये ठेवण्यात आले आहे. राहील येथे गेले अनेक महिन्यापासून रेती व माती मोठ्या जोमामध्ये उपसा होत असून याकडे मात्र राहेर सज्जाचे कर्तव्यदक्ष तलाठी श्री बी आर डाकेवार यांनी सूक्ष्मदर्शक दृष्टी ठेवून आणि राहेर येथे गोदावरी नदी पात्रात वाळू उत्खनन होण्याची शक्यता व त्या संदर्भातील सर्व माहिती मिळताच तलाठी श्री डाकेवार यांनी त्यांच्या वरिष्ठांशी माहिती देऊन व तहसील कार्यालय मधील महसूल प्रशासनाचे पथक बोलावून त्यांच्यावर चांगलाच लगाम लावल्याचे दिसून आले आहे.
राहेर येथे एकूण तीन ठिकाणाहून अवैध रेती उत्खनन होती मात्र नायगाव तहसील कार्यालयातील प्रतिबंधक पथकाने माननीय तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने ही कारवाई करण्यात आली आहे व राहेर येथील अवैध रित्या वाळू व माती माफियांना इशारा देत व त्यांच्या मुस्क्या आवळून त्यांचे सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे.
चौकट.,…
राहेर येथील गोदावरी नदीपत्रातून अवैध रीत्या वाळू व माती व्यवसायिकानी बाहेर परिसरात कहर माजवल्याने व अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची खुळखुळ आणि रस्त्यांची दुरवस्था करणाऱ्या माफी यावर कठोर कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आता स्थानिक नागरिकाकडून होताना दिसून येत आहे.
सदर पथकात नायगावच्या दमदार व धाडसी कर्तव्यदक्ष तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड मंडळ अधिकारी श्री आर. के. पवार, राहेर सज्जाचे तलाठी बी. आर.डाकेवार, पी. व्ही. हक्के,पी.एस. कदम, बामणीकर,अदी उपस्थित होते.