नांदेड जिल्हा प्रतिनिधी/
नांदेड – आज भाजपा लोकसभा प्रचार कार्यालय नांदेड येथे महायुतीचे नांदेड लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बैठक पार पडली.
याप्रसंगी उपस्थित राहून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले व महायुतीचे उमेदवार श्री. प्रतापराव पाटील चिखलीकर यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने समर्पित भावनेने काम करावे असे आवाहन केले.
यावेळी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, आमदार श्री. राजेश पवार, भाजपा मराठवाडा संघटन मंत्री श्री. संजय कौडगे यांच्यासह भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते !