नांदेड जिल्हा प्रतिनिधी
नांदेड – 16 नांदेड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्री.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारात देशाचे कणकर गृहमंत्री,लोहपुरुष अमितभाई शहा व राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री श्री माननीय देवेंद्रजी फडवणीस साहेब यांच्या नरसी येथे प्रचार सभा काल झाली. ह्या प्रचार सभेत बोलताना सांगितले कि देशाचे सक्षम नेतृत्व माननीय नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी,मा.मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी, देशाच्या विकासासाठी प्रतापराव पाटील चिखलीकर यांना बहुमताने विजयी करावा लागेल.तसेच देशाच्या सक्षम नेतृत्वासाठी मा.नरेंद्र मोदीजी शिवाय दुसरा कुठलाच पर्याय उपलब्ध नसल्याने सर्व सुजाण मतदारांनी येणाऱ्या 26 तारखेला कमळ या निशाणीवर बटन दाबून प्रतापराव पाटील चिखलीकर यांना प्रचंड मतांनी विजयी करावे.