धन दांडग्या उमेदवाराचा प्रचार जोरात…

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

 

प्रमाणिक आणि प्रभावी उमेदवार मात्र हात जोडण्यात परेशान

राज्याचे लक्ष नांदेडच्या लढतीकडे

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

नांदेड – लोकसभा मतदानाची तारीख जशी जशी जवळ येत आहे, तसतसा प्रचारात रंग भरत असून, संपूर्ण राज्याचे लक्ष नांदेडकडे लागले आहे.महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर असले तरीही माजी मुखमंत्री अशोकराव चव्हाण यांना विरोधकाच्या टीकेला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. 

ही लढत धन दांडग्याची दिसत असली तरी त्यांच्याविरुद्ध 22 उमेदवार रिंगणात आहेत.ते ते प्रमाणिक उमेदवार मतदारांना हात अजून विनंती करून आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी मतदारासमोर जात आहे. त्यांना कुठलाही अडथळा निर्माण होताना दिसून येत नाही.

भारतीय जनता पार्टीने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना भाजपा पक्षात घेऊन खासदारकी दिली मात्र सर्वसामान्य कार्यकर्ता त्यांच्या भाजपा प्रवेशाबद्दल खुश दिसत नाही.मोदी सरकार पुन्हा आले तर चव्हाण यांचे केंद्रातील मंत्रीपद फिक्स असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे,मात्र त्यांचे भाजपमध्ये जाणे मुस्लिम कार्यकर्त्यांसह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना खटकले आहे.भोकर मतदार संघातील त्यांचे राजकीय भवितव्य धोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे. 

अशोकराव चव्हाण हे किती मोठ्याने ओरडून सांगत असतील की मी विकासासाठी भाजपा पक्षात प्रवेश केला.तर दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकात दल बदलू उमेदवाराला भाजपाने तिकीट दिल्यामुळे निष्ठावंत भाजपाचे कार्यकर्ते नाराज असल्याचे दिसून येते.आज या पक्षात, उद्या त्या पक्षात म्हणून नायगाव परिसरात प्रचंड नाराजी सूर निघत आहे.23 उमेदवारांपैकी 50 टक्के उमेदवार हे प्रमाणिक अभ्यासू विकास दृष्टिकोन असलेले आहेत परंतु त्यांच्याकडे पक्ष नाही आणि धनसंपत्ती सुद्धा नाही धन संपत्ती यासाठी नाही त्यांनी काही लफडे केले नाही त्यांच्याविरुद्ध काही घोटाळे सुद्धा नाही अशाप्रमाणे उमेदवार हाच लोकशाहीचा सक्षम उमेदवार समजला जातो

भोकर मतदार त्यांची पूर्वीची असलेली प्रतिमा आता दिवशी दिवस धुळसर होताना दिसून येते.भोकर मतदारसंघ हा त्यांचा बालेकिल्ला समजला जात होता परंतु अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथे त्यांना घेराव घातला या प्रकरणी गावकऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे आणि मुदखेड तालुक्यातील माळकोटा येथे माजी आमदार अमिताताई चव्हाण यांनाही सकल मराठा कार्यकर्त्यांनी घेराव घातला होता.वास्तविक पाहता गाव बंदी करणे कायद्याने गुन्हा आहे. परंतु नागरिकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार लोकप्रतिनिधींना आहे ना ? असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. 

अशा घटना घडू नये म्हणून त्यांनी पोलीस संरक्षण वाढविले आहे.त्यांना तगडा बंदोबस्त घेऊन फिरावे लागत आहे ही वेळ त्यांच्यावर का आली असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकासमोर पडला आहे.

लोकसभा निवडणूक प्रचाराचा धुरळा एकीकडे वाढत असताना दुसरीकडे प्रमाणे आणि प्रभावी उमेदवारांना मतदारापर्यंत पोहोचण्यास आर्थिक बळ कमी पडत आहे.काल नरसी येथे झालेल्या देशाचे ग्रहमंत्री अमित शहा यांची सभाही फक्त नांदेडला घेणे आवश्यक असताना एका तालुक्याच्या चौकात मतदारांना चिकन बिरयाणी व बकरे कापून खाऊ घालण्यात आले तर सभेला गर्दी दाखवण्यासाठी प्रति व्येक्ती पाचशे रुपये देऊन गर्दी जमवण्यात आली असल्याचे दाबक्या आवाजात चर्चा एकण्यात आली असून देश्याचे ग्रहमंत्रीही यावेळी कबूल केले की या वेळी नांदेडची हवा बदली असल्याचे मतही त्यांनी आपल्या भाषणात आवरजुन उल्लेख केला आहे.

Share This Article
error: Content is protected !!