नवी दिल्ली – केंद्रीय लोकसेवा आयोगाने मंगळवारी नागरी सेवा परीक्षा, 2023 चे निकाल जाहीर केले. ही परीक्षा सप्टेंबर 2023 मध्ये घेण्यात आली होती तर मुलाखती जानेवारी ते एप्रिल 2024 दरम्यान घेण्यात आल्या होत्या, असे UPSC ने सांगितले. आदित्य श्रीवास्तव यांनी अव्वल स्थान पटकावले, तर अनिमेश प्रधान आणि डोनुरु अनन्या रेड्डी यांना द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळाला. पीके सिद्धार्थ रामकुमार चौथ्या क्रमांकावर आहे