400पार मध्ये एक मत निश्चितच हिंगोलीचे असेल ! -रामदास पाटील सुमठाणकर

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

 

 

हिंगोली जिल्हा प्रतिनिधी/बजरंगसिंह हजारी

हिंगोली- “भारताला एक विकसीत बलशाली राष्ट्र बनविण्यासाठी आपण सर्वजण कार्य करत आहोत.त्यासाठी यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविणे ही आपली सर्वांची क्रमप्राप्त जबाबदारी आहे.आणि म्हणून,अबकी बार 400पार चा नारा यशस्वी करण्यासाठी महायुतीला अर्थातच मोदी यांना एक मत निश्चितच आपल्या हिंगोली लोकसभेचे असेल!”*असा निर्धारपूर्वक ठाम विश्वास भाजपाचे नेते तथा हिंगोली लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर यांनी व्यक्त केला आहे.

येत्या 26एप्रिल रोजी होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारासाठी भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी हे सर्व सक्रीय होऊन झपाटून कामाला लागलेले आहेत.

पायाला भिंगरी बांधल्यागत बूथ निहाय,सर्कल निहाय संवाद दौरा, कॉर्नर बैठकांचा सपाटा सुरू आहे.

   

भारतीय जनता पार्टी, शिवसेना , राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम हे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आहेत.त्यामुळे बाबुराव कदम यांना सामान्य जनतेच्या प्रश्नांची अंतःकरणाने जाणीव असल्याने ते सर्वसामन्यांचे विविध प्रश्न दिल्ली दरबारी अतिशय पोटतिडकीने मांडतील असा विश्वास आहे.बाबुराव कदम यांच्या पाठीशी भाजपची सर्व संघटनात्मक यंत्रणा पूर्ण ताकदीनिशी सज्ज असल्याने ते सहज विजयी होतील असा विश्वास असून,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखालीच देशाचा विकास झाला आहे. ‘सब का साथ,सब का विकास,’ या मोदींच्या घोषणेवर विश्वास ठेवून आम्ही कार्यकर्ते कामाला लागलो आहोत.मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार याची देशातील जनतेसह संपूर्ण जगाला खात्री आहे. आणि म्हणूनच,प्रत्येक मतदाराने जात, धर्म सोडून मोदींना मतदान देण्याचे घट्ट मन बनवले असल्याचे दिसून येत असल्याचे सुमठाणकर यांनी यावेळी आवर्जून सांगतानाच ही राष्ट्रीय निवडणूक असल्यामुळे देशहितासाठी एक मत मोदींना देण्याची विनंती रामदास पाटील यांनी यानिमित्ताने सुजाण नागरिकांना केली.

   पंतप्रधान मोदी यांनी केलेली विकासकामे तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचली असल्याने महायुतीच्या विजयाचा मार्ग सुकर आणि आणखी प्रशस्त झाला आहे.गत लोकसभेच्या मतांपेक्षा यावेळी जास्तीचे मताधिक्य घेऊन महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम हे निवडून येतील दृढविश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

महायुतीतील सर्व घटक पक्षांचे मनोमीलन असून, प्रत्येक उमेदवार निवडून यावा यासाठी सर्वजण एक वज्रमुठीने दिवस-रात्र प्रचारकार्य करत असल्याची माहिती देत हिंगोली लोकसभेत बाबूराव कदम कोहळीकर यांना विक्रमी मताधिक्य मिळण्यासाठी सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी कोणतीही कसर न सोडता अबकी बार विजयी खासदार 400पार, नरेंद्र मोदी पंतप्रधान तिसरी बार और इसकेलिये हिंगोली लोकसभा में बाबुराव कदम पहलीबार खासदार बनविण्यासाठी भाजपाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अगदी कंबर कसून प्रयत्नपूर्वक निवडणुक जिंकायचीच या निर्धाराने काम करावे!”असे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन तर मतदारसंघातील विकासप्रिय सुज्ञ नागरिकांना विनंती केली.

Share This Article
error: Content is protected !!