नांदेड येथे लोकस्वराज्य आंदोलनाची महत्त्वपूर्ण कार्यकर्ता संवाद बैठकीचे आयोजन…..

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

नांदेड प्रतिनिधी /माधव काईतवाड 

नांदेड – सामाजिक न्यायाच्या प्रश्नावर नेहमी अग्रेसर असणारी,अखंड लढा देणारी आक्रमक तथा स्वाभिमानी लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र या सामाजिक संघटनेच्या वतीने नेते, पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद बैठकीचे आयोजन नांदेड येथे दिनांक १९एप्रिल २०२४ रोज शुक्रवारी दुपारी बारा वाजता नमस्कार चौक,गणराज पॅलेस हॉटेल नांदेड येथे तातडीची बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये संघटनेच्या कार्यकर्त्यांचे विविध विषयावर चर्चा व पुढील धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी कार्यकर्त्यांचे मते यावेळी बैठकीत जाणून घेण्यात येणार आहे.तसेच चालू घडामोडीवर सुद्धा विचार विनिमय व मंथन यामध्ये होणार आहे.तरी तमाम विभागीय स्तरावरील व जिल्हा स्तरावरील सर्वच नेते,पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी या बैठकीला आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन नांदेड जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे.यावर सर्व नेते आणि कार्यकर्त्यांच्या विचाराची देवाण-घेवाण होऊन,यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी कार्यकर्ता संवाद बैठक बोलवण्यात आली आहे.या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून संघटना प्रमुख प्राध्यापक रामचंद्रजी भरांडे सर नांदेड, व्ही.जी.डोईवाड,रावसाहेबदादा पवार यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभणार आहे.तसेच जिल्ह्यात नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी सुद्धा यावेळी करण्यात येणार आहे. बैठकीला नांदेड जिल्ह्यातून तमाम आजी-माजी नेते, पदाधिकारी,कार्यकर्ते, समर्थक, पत्रकार व समाज बांधवांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे, आवाहन ज्येष्ठ नेते बालाजी बंगारीकर,संतोष तेलंग,बाळासाहेब टिकेकर,कैलास सूर्यवंशी,धोंडोपंत बनसोडे,संभाजीराजे वाघमारे,माणिक कांबळे,अंकुशदादा गायकवाड, साईनाथ जळपतराव,सुनील जाधव आदींनी केले आहे.

Share This Article
error: Content is protected !!