हुस्सा येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री वसंतराव पाटील चव्हाण यांच्या प्रचारार्थ कॉर्नर बैठक संपन्न….

abhishek bakkewad
4 Min Read
Spread the love

 नांदेड प्रतिनिधी अशोक वाघमारे 

नांदेड – नायगाव तालुक्यातील मौजे हुस्सा येथे नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुक अनुषंगाने कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री वसंतराव पाटील चव्हाण यांच्या समोरील पंजा या निशाणीचे बटन दाबून आशीर्वाद देण्याचे विनंती नायगाव विधानसभेचे युवा नेते श्री रविंद्र पाटील चव्हाण यांच्या अर्धांगिनी सौ सोनिया ताई रवींद्र पाटील चव्हाण यांनी केले आहे.

     

सदर बैठक दिनांक 17/ 4/ 2024 रोजी स्थळ सामाजिक कार्यकर्ते श्री डी के वाघमारे यांच्या निवासस्थानी करण्यात आले होते. बैठकीदरम्यान मीनाताई सुरेश पाटील कल्याण नगराध्यक्ष नायगाव, सौ प्रीतीताई सुधाकर पाटील जुनीकर, अश्विनीताई बाबासाहेब पाटील शिंदे, रेणुका ताई कल्याण, हुस्सा येथील दमदार सरपंच सौ सुलोचना ताई रमेशराव पाटील हंबर्डे, विद्याबाई अशोकराव पाटील हंबर्डे, श्री रमेशराव रामराव माली पाटील, सौ विमलबाई हंबर्डे, सौ अलकाताई हंबर्डे, यांनी उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.

         

सदर बैठकीत काँग्रेसचे ध्येयधोरणे व विकास कामे करण्याची गती असल्याने काँग्रेसला येणाऱ्या काळामध्ये अच्छे दिन येण्याचे दिवस येत असून काँग्रेसने गेल्या साठ वर्षाच्या काळामध्ये देशाला विकासात्मक कामातून जगभरात ओळख निर्माण करून दिली आहे. मुळातच देशाचा विकास कामाची पायाभरणी हे काँग्रेस पक्षांनी केला असून त्यामुळेच देशाला विकासात्मक गती मिळाली आहे. देशामध्ये शासकीय संस्था शाळा कॉलेजेस रेल्वे बस स्टॅन्ड बस स्थानक आयटी कॉलेज आय आय टी कॉलेज मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज यासारख्या विविध शैक्षणिक संस्था खोलून देशातील युवकांना शिक्षण देण्याचे काम काँग्रेसने केले आहे. देशाचे हित जोपासत असताना देशातील नागरिकांना देखील मान सन्मानाची वागणूक काँग्रेसने दिली आहे. असेही सौ सोनियाताई रविंद्र पाटील चव्हाण यांनी म्हणाले आहे. म्हणून देशाच्या विकासात्मक काँग्रेसचे मोठे योगदान असल्याने देशामध्ये परिवर्तनाची लाट सध्या परिस्थितीत असल्याने नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे वातावरण मोठ्या प्रमाणात सकारात्मक असल्याने भाजपच्या पायाखाली वाळू सरकल्याने भाजपचे केंद्रीय मंत्र्यांची रांगा नांदेड जिल्हा व नांदेड लोकसभा मतदारसंघाकडे लागत आहे. काँग्रेस पक्षांचे नांदेड जिल्ह्यामध्ये वातावरण सकारात्मक असल्याने भाजपवाले केंद्रीय व राज्यातील मंत्र्यांच्या सभा घेत आहेत. जरी किती सभा लावल्या तरी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे काँग्रेसचा बालेकिल्लाच राहणार असेही प्रतिपादन सोनियाताई रवींद्र पाटील चव्हाण यांनी केले आहे.

      सदर बैठकीत श्री राजेश पाटील हंबर्डे यांनी बोलत असताना म्हणाले की काँग्रेस ही विकास कामांच्या व रोजगारांच्या शिक्षणाच्या उद्योगांच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत असून त्यामुळे काँग्रेसला देशामध्ये मोठ्या प्रमाणात जनाधार असल्याने भाजपच्या मनामध्ये धडकी भरले आहे. नायगाव करांचे व नांदेड जिल्ह्यातील जनतेचे अतूट प्रेम असल्याने जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला सन्मानांची वागणूक मिळवण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे श्री वसंतराव पाटील चव्हाण यांचे कार्यालय या भागातील काम करत असताना श्री वसंतराव पाटील चव्हाण यांनी कधीच कंजूषपणा न करता विकास कामाला गती देऊन मोठ्या प्रमाणात काम केली आहेत. श्री वसंतराव पाटील चव्हाण यांनी जनसामान्यांमध्ये 24 तास काम करत असल्याने सर्वसामान्य जनता ही वसंतराव पाटील चव्हाण यांना चांगल्या पद्धतीने ओळखत आहे. जिल्ह्यातील गोरगरीब व सर्वसामान्य जनतेच्या सुखात दुःखात साथ देणारे श्री रवींद्र पाटील चव्हाण यांनी अहोरात्र जनसेवेसाठी तत्पर आहेत आणि राहणार त्यामुळे विकास कामांच्या जोरावर काँग्रेस पक्षाला मत देऊन श्री वसंतराव पाटील चव्हाण यांचे हात बळकट करावे असे आव्हान देखील श्री राजेश पाटील हंबर्डे यांनी केले आहे.

        बैठकीचे प्रस्ताविक सामाजिक कार्यकर्ते श्री डी के वाघमारे यांनी केले असून. सदर बैठकीला गावातील माधवराव वाघमारे शंकरराव वाघमारे गणपत वाघमारे भगवान गायकवाड आनंदा गायकवाड केरबा गायकवाड पांडुरंग वाघमारे मधुकर हंबर्डे चक्रधर हंबर्डे दिगंबर हंबर्डे परसराम जालनेकर महेश हंबर्डे उत्तम चौधरी, आनंदा वाघमारे अविनाश वाघमारे राजेश वाघमारे किशोर वाघमारे प्रदीप वाघमारे, गंगाधर वाघमारे रावसाहेब तेलंगे संजय वाघमारे दिगंबर वाघमारे चंद्रकांत वाघमारे सौ साखरबाई गायकवाड शेषाबाई वाघमारे शोभाबाई वाघमारे कोमल अशोक वाघमारे शांताबाई वाघमारे गीताबाई वाघमारे गंगाबाई गायकवाड सुमनबाई वाघमारे कौशल्याबाई तेलंगे महानंदा तेलंगे आधी महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!