नायगाव प्रतिनिधी
नायगाव – लोकस्वराज्य आंदोलन ही सामाजिक लढाऊ संघटना गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील तळागाळातील उपेक्षित लोकांसाठी व त्यांच्या विविध प्रश्नासाठी सातत्याने रस्त्यावर आंदोलन छेडून समता व समाज परिवर्तनाची भूमिका बजावली आहे. सध्या देशात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोणत्या पक्षाच्या उमेदवारांना आपला जाहीर पाठिंबा असणार आहे याबाबत 19 एप्रिल रोजी लोकस्वराज्य आंदोलन आपली भूमिका ठरविणार आहे.
देशामध्ये होत असलेली लोकसभा निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि एकंदरीत देशातील परिस्थिती पाहता सत्तेवर सर्व जाती धर्माच्या लोकांना समानतेची वागणूक मिळेल अशा पद्धतीची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी निवडणूक रिंगणात विविध पक्षांचे उभे असलेले उमेदवार सर्वसामान्य लोकांसह आपल्यासाठी कोणता योग्य राहील यासाठी आपला पाठिंबा दर्शविण्यासाठी नांदेड येथील नमस्कार चौक, गणराज हॉटेल येथे 19 एप्रिल रोजी लोकस्वराज्य आंदोलनाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे यामध्ये सदर संघटनेचे प्रमुख प्रा.रामचंद्र भरांडे आपली भूमिका ठरवतील असे लोक स्वराज्य आंदोलन कामगार आघाडीचे प्रमुख रावसाहेब पवार,चिफ कमांडर राज्य प्रमुख शेषराव रोडे, मराठवाडा उपाध्यक्ष डि.के. पवार तालुकाध्यक्ष गणपत पवार, निष्ठावंत कार्यकर्ते गणपत रेड्डी, ऊनकेश्वर रोडे, अशोक गारोळे यांनी आमच्या प्रतिनिधी बोलताना आपली भूमिका विशद केली असून या आज होणाऱ्या बैठकीस लोक स्वराज्य आंदोलनाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असेही आवाहन करण्यात आले आहे.