मतदारांमध्ये मतदानाबाबत पथनाट्याद्वारे जनजागृती

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

हिंगोली जिल्हा प्रतिनिधी/ बजरंगसिंह हजारी

हिंगोली (जिमाका)- : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आज बुधवार 17एप्रिल रोजी नरसी तसेच पुसेगाव येथे पथनाट्यातून मतदारांमध्ये कला पथकामार्फत जनजागृती करण्यात आली.    

 

यावेळी नरसी येथे संत नामदेव महाराजांच्या मंदिर परिसर आणि पुसेगावात मतदार जनजागृती कार्यक्रमावेळी उपस्थित नागरिकांनी मतदान जनजागृतीसाठी मतदानाची प्रतिज्ञा घेतली. याप्रसंगी नरसी आणि पुसेगाव येथील नागरिक उपस्थित होते.

 

        जिल्ह्यात मतदार जनजागृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने अनेक ठिकाणी रॅली, बैठका तसेच मतदान जनजागृतीची प्रतिज्ञा घेऊन लोकशाहीत मतदानाचे महत्त्व पटवून देण्याचे काम करण्यात येत आहे.

Share This Article
error: Content is protected !!