देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची नांदेड येथे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार सभा.

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

 नांदेड प्रतिनिधी / अशोक वाघमारे 

नांदेड – दि. 18- भाजप-महायुतीचे नांदेड लोकसभेचे उमेदवार खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट जाहीर सभा शनिवार दि. 20 एप्रिल रोजी सकाळी 9.00 वाजता मोदी ग्राऊंड, शिवरत्न जिवाजी महाले चौक (मामा चौक) असर्जन रोड, कौठा येथे आयोजित करण्यात आली आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी येणारा लाखोंचा जनसमुदाय लक्षात घेता सभास्थळी विशाल सभामंडप व भव्य व्यासपीठ उभारण्यात येत आहे. शिवाय महिलांसाठी विशेष आसन व्यवस्था करण्यात येत असून उन्हाची तीव्रता लक्षात घेता सभास्थळी सुरक्षित आसरा व पाण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह राज्यातील व जिल्ह्यातील अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती राहणार आहे. नरसी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विक्रमी जाहीर सभेनंतर नांदेड लोकसभा मंतदारसंघात संपूर्ण भाजपमय वातावरण निर्माण झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अतिवराट जाहीरसभा होणार असल्यामुळे या सभेसाठी नांदेडवासीय उत्सूक आहेत. सभेला मोठ्या संख्येने उपस्थितत रहावे, असे आवाहन भाजप-महायुतीच्यावतीने करण्यात आले आहे.

Share This Article
error: Content is protected !!