वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने किनवट,माहूर,परिसरात अवैद्य वृक्षतोड सुरूच….जबाबदार कोन….

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – जिल्यातील एकमेव वनराई असलेल्या तेलगाणा राज्याच्या सीमेवर असलेल्या किनवट,चिखली,बोधडी,व माहूर तालुक्यात मांडवा,वजरा,दत्तमांजरी, कासारपेठ,या जंगलातील वृक्षसंपत्ती आज कमी झाली आहे.ती अधिकाऱ्यांनी विकुन अमाप सम्पती जमा केली की तसकऱ्यांनी तोडून घेऊन गेली हा संशोधणाचा विषय आहे.

राखीव वनक्षेत्रात प्रामुख्याने अशा घटना अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने करण्यात.संबंधित परिसरातील काही वन पालापासून बड्या अधिकाऱ्यापर्यंत हात असण्याचा अंदाज नागरिकांकडून बोलले जात आहे.किनवट,माहूर तालुक्यातील साग खैर या वृक्षाला परजिल्ह्यात मोठी मागणी होत असते;मात्र वन विभागाच्या नाममात्र चौक्या वर होणारी निष्क्रिय तपासणी, देण्यात येणारा पास आशा बाबी महत्वाच्या असतात.याचा अडथळा दूर करण्यासाठीही बऱ्याच वेळा लाकूडपट्टी व्यवसायाकडून मोठ्या आमिषांना बळीपडल्याचे प्रकार होत असतात.त्यामुळे सत्य परिस्थिती लपविण्यात येऊन किनवट -माहूर तालुक्यात खाजगी तसेच शासकीय राखिव वनक्षेत्रातील वृक्षसंपत्ती तोड करून पर जिल्ह्यात व पर राज्यात जात आहे.

माहूर,किनवट,तालुक्यातील खासगी वन क्षेत्रात स्वार्थासाठी यंदाच्या वर्षात यात साग,खैर,निन्ब,आंबा आशा अनेक वृक्षाची तोड झाली आहे.तर खैरची झाडे,इतर वृक्षांची संख्या पाहता तब्बल हजारो वृक्षांची तोड केली जात आहे.

यामुळे मोठ्या प्रमाणात वनाच्छादित क्षेत्र घटनेचा धोका पर्यावरणाला निर्माण होण्याची शक्यता आहे.तर राखीव वन क्षेत्रात वनपाल,वन मजूर यांची गस्ती असताना सुद्धा बेकायदा वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे.

 यावर शासनाने लवकरच काहीतरी मार्ग काढून जंगल संरक्षणाचा कायदा करण्याची गरज आहे. जबाबदार वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी किनवट,माहूर तालुक्यातून नागरिक करीत आहे.

Share This Article
error: Content is protected !!