लोकसभेच्या धामधुमीत लाखो शेतकरी अनुदाना पासून वंचीत..

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

शेतकरी त्रस्त राज्यकर्ते मस्त

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – शासकीय अनुदाना बरोबर पंतप्रधान सन्मान योजना व मुख्यमंत्री यांच्या योजने अंतर्गत मिळणारे शेतकऱ्यांना पैसे शेकडो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत नसल्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत परिणाम होणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.

या राज्यातल्या राज्य सरकारने केवायसीच्या नावाखाली शेतकऱ्यांना मिळणारे शासकीय अनुदान अंगठा येत नसल्याने मिळत नाही व शेतकरी वंचित असल्यामुळे त्यांचा लोकसभा निवडणुकीवर थेट परिणाम होणार असल्याचे सरळ सरळ चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.

शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले होते आणि सरकारने अनुदान ही जाहीर केले होते परंतु थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईचे अनुदान केवायसीचा दांडू अडकून ठेवल्याने व केवायसी करण्यासाठी गेलेल्या अनेक शेतकऱ्यांचा अंगठा येत नसल्याने सदरचे अनुदान शासनाकडे पडून असल्याचे सांगण्यात येते.

परंतु त्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात अद्याप तरी अनुदान जमा करण्यात आले नाही अनेक वेळा शेतकरी बँका कडे जाऊन अनुदान पडले असेल असी अपेक्षा करीत चौकशी केली असताना सुद्धा कसल्याच प्रकारचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पडले नाही असे शेतकऱ्यांतुन सांगितले जात आहे.

पंतप्रधान सन्मान योजनेचे दर चार महिन्याला मिळणारे दोन हजार रुपये आणि मुख्यमंत्री यांच्या योजने अंतर्गत मिळणारे दोन हजार रुपये बऱ्याच पैकी शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होत नसल्यामुळे शेतकरी हैराण होत असला तरी त्यांचा परिणाम या सदरच्या लोकसभा निवडणुकीत होणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.

Share This Article
error: Content is protected !!