19 तारीख उजाडली तरी हजारो पेन्शन धारक पेन्शन विनाच!

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

पंचायत समितीच्या लेखापालचा प्रताप

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – जिल्यातील धर्माबाद तालुक्या मधील आज घडीला 19 तारीख उजाडली तरीही धर्माबाद शहरासह तालुक्यातील हजारो पेन्शन धारक पेन्शन विनाच असल्यामुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

रमजान ईद,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व रामनवमी असे प्रमुख सण पेन्शन विनाच गेले आहे.

पंचायत समिती अंतर्गत हजारो शिक्षक व इतर कर्मचारी पेन्शन धारक आहेत.त्यातल्या त्यात आपले पेन्शनधारक पती स्वर्गवासी झाल्यावर पत्नीला जे दुय्यम क्रमांकाचे पेन्शन मिळते असे पेन्शन धारकही भरपूर असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.

इतर तालुक्यातील पेन्शन हे १४ एप्रिलच्या अगोदर झाल्याच्या प्रतिक्रिया पेन्शन धारकातून येत असून उपरोक्त पार्श्वभूमीवर प्रस्तुत प्रतिनिधीने पंचायत समितीचे मुख्य लेखापाल अकोलकर यांच्याशी चर्चा केली असता बजेट उशिरा आले, निवडणूक ड्युटी लागलेली आहे त्यामुळे उशीर होत आहे अशी उडवाउडीची उत्तरे त्यांच्याकडून मिळत असताना इतर तालुक्याचे पेन्शन कसे होते? असा प्रश्न निर्माण होत आहे. 

त्यामुळे पेन्शन धारकांमध्ये संतापाची लाट उसळत असून गटविकास अधिकाऱ्यांनी या बाबीकडे तात्काळ लक्ष देऊन पेन्शन धारकाचं पेन्शन लवकरात लवकर जमा व्हावे याकडे लक्ष देण्याची मागणी होत असून मुद्दाम पेन्शन धारकाची अडवणूक केल्यास सदरील कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणीही पेन्शन धारकातून होत आहे.

Share This Article
error: Content is protected !!