नांदेड जिल्हा प्रतिनिधी (अशोक वाघमारे).
नांदेड लोकसभा मतदारसंघात अतिशय चुरशीची लढत होत असून या निवडणुकीकडे सबंध देशाचे लक्ष लागले आहे. यात अटीतटीच्या निवडणुकीत नांदेड लोकसभेत तिरंगी लढत होताना दिसून येत आहे एकंदरीत भाजपा महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांना भाजपाने दुसऱ्यांदा उमेदवारी बहाल करून पुन्हा एकदा नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधी करण्याची संधी पक्षश्रेष्ठींनी दिली पण मागील पाच वर्षात श्री प्रतापराव चिखलीकर यांनी नांदेड जिल्ह्यातील मोजक्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन व मोजके विभागात गाव भेटी दिले आहेत आणि विकास कामाच्या बाबतीत फारसं महत्त्व नसल्याने खासदार चिखलीकर यांना जिल्ह्यातील अनेक भागात परिचित व काही सामान्य जनतेला नाव देखील माहीत नसल्याची चर्चा होताना दिसून येत आहे. नांदेड जिल्ह्यात भाजपाने अनेक नेत्यांना आयात करून त्यांना संधी दिली आहे पण जिल्ह्यातील भाजपा निष्ठावा नेत्यांना व कार्यकर्त्यांना संधी दिल्या नसल्याने जिल्ह्यातील निष्ठावंत भाजप कार्यकर्ता व नेत्यांमध्ये नाराजिचा सूर असल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे भाजपात वेगवेगळे गट निर्माण होऊन त्या त्या गटांनी आपले वर्चस्व पणाला लावले आहेत आणि भाजपा कार्यकर्ते कसून काम करत आहे असून यात आयारामांच्या प्रवेशाने व त्यांच्या नेतृत्वाने नांदेड भाजपामध्ये दिवसेंदिवस निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये निराशा घेऊन जगावे लागत आहे. भाजपामध्ये मी बडा तो बडाच्या नावाखाली जिल्ह्यातील सर्व सामान्य मतदारांना गोळा करण्यात व शक्तिप्रदर्शन करून वर्चस्व निर्माण करण्यात भाजप निष्ठावंत कार्यकर्ते नेते जिल्ह्यातील प्रत्येक कार्यक्रमांमध्ये काम करत आहेत मात्र याच निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांच्या जोरावर आयाराम नेते मात्र संधी साधूपणा करून व स्वतःचा मोठेपणा दाखवत असल्याची चर्चा जनतेमध्ये होताना दिसून येत आहे.
देशामध्ये भाजपचे गेले दहा वर्षापासून सत्ता असून देखील नांदेड लोकसभा मध्ये भाजपचे शेवटी अडले कुठे? कारण नांदेड मध्ये भाजपचे खासदार चिखलीकर यांच्या कार्यप्रणालीवर लोक नाराज आहे का? किंवा भाजपाच्या कार्यप्रणालीवरचा विश्वासार्थ उडाला का? की एकीकडे भाजप खासदार असून व देशात आणि राज्यात सरकार असून देखील जिल्ह्यातील जनतेचा कौल मात्र भाजप विरोधी जाताना दिसून येत आहे. भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी दोन माजी मुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री,राज्याचे ग्रामविकास मंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री, आणि देशाचे गृहमंत्री, आणि देशाचे पंतप्रधान यांच्या वारंवार सभा घ्यावं लागत आहेत. देशातील भाजप-श्रेष्टींना केवळ नांदेड लोकसभेची धसकी बसली आहे का? असे प्रश्न जनसामानातून उठत आहे.
2019 च्या निवडणुकीत राज्याची माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लोकसभेच्या रिंगणात असताना खासदार चिखलीकर यांनी मोदीची सभा लावली होती आणि त्या निवडणुकीत श्री चिखलीकर यांचा विजय झाला आणि अशोक चव्हाण यांना पराभव पत्करावा लागला जिल्ह्याचे मातब्बर नेते अशोक चव्हाण व चिखलीकर यांनी तब्बल 25 वर्षे एकमेकांच्या विरोधात असणारे आता मात्र अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने नांदेड भाजपाला अच्छे दिन अशा भावनेतून श्री अशोक चव्हाण यांच्यावर भाजप श्रेष्ठींनी जबाबदारी टाकली पण जिल्ह्यातील सकल मराठा समाजाकडून आरक्षण विषयी श्री अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध रोष असल्याचे दिसून येत आहे. अशोक चव्हाण यांना मराठा समाजाच्या रोषाला वारंवार सामोरे जावे लागत असून अशोक चव्हाण यांच्या भाजपाचे प्रवेशाने नांदेड जिल्ह्यातील जनतेला तू कुठेतरी जिव्हारी लागलेला आहे. त्यामुळेच अशोक चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वावर लोक नाराजी असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. एकंदरीतच अशोकराव चव्हाण यांच्या वरचा विश्वास जनतेने कुठेतरी गमावलेला आहे असेच काहीतरी चित्र नांदेड जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे. म्हणूनच सर्वांना नांदेड जिल्ह्यात अशोकराव चव्हाण यांच्या विषयी तीव्र नाराजी असल्याचे जनतेत चित्र दिसून येत आहे. अशोक चव्हाण यांच्या सभेत कुठे गोंधळ तर कुठे त्यांचा ताफा आडविण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे आणि काही ठिकाणी अशोक चव्हाण विरुद्ध घोषणाबाजी देखील करण्याचे चित्र दिसून येत आहे यामुळे कुठेतरी त्यांच्या नेतृत्वाकडे जनतेने पाठ फिरवित भाजप व भाजप नेत्यांना विरोध करताना दिसून येत आहे. त्यामुळेच राज्याचे मंत्री व केंद्रातील गृहमंत्री पंतप्रधान यांच्यासारख्या नेत्यांना नांदेडमध्ये तळ ठोकून राहावे लागत आहे आणि त्यांच्या सभा वारंवार लावाव्या लागत आहेत.
नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार श्री वसंत बळवंतराव चव्हाण असून त्यांना जिल्ह्यातील सर्व भागातून मोठा प्रतिसाद मिळत आहे याचे कारण असे सांगण्यात येत आहे की श्री वसंत चव्हाण हे अतिशय प्रेमळ शांत स्वभाव विकास कामाची अचूक माहिती असणारे व सर्व सामान्य जनतेला आपलस करणारे जनतेला सन्मानाची वागणूक देऊन व त्यांच्या सुखा दुखात अडीअडचणला सामोरे जाऊन त्यांना मदत करणारे असे म्हणून नांदेड जिल्ह्यातील सर्व भागात परिचित आहेत आणि श्री वसंतराव चव्हाण यांचा जनसंपर्क नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असल्याने काँग्रेस श्रेष्ठींनी त्यांच्या उमेदवाराचा विचार करून त्यांना उमेदवारी बहाल केली आहे. श्री वसंतराव चव्हाण यांचा राजकीय प्रवास नायगाव ग्रामपंचायत सदस्य पासून ते जिल्हा परिषद सदस्य, विधान परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे या राजकीय प्रवासात जिल्ह्यातील राजकीय गणित जुळून व नांदेड जिल्ह्यात मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदावर काम करीत असताना शेतकरी व गोरगरिबांच्या व सर्वसामान्य जनतेशी नाळ तयार करून जनतेला एकरूप केले आहे. त्यामुळे त्यांच नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जनसंपर्क असून त्यांच्या राजकीय कारकीर्दीत स्वर्गीय शंकरावजी चव्हाण व स्वर्गीय बळवंतरावजी चव्हाण त्यानंतरच्या काळात श्री अशोक चव्हाण यांची आशीर्वाद मिळाल्याने त्यांचे राजकीय जीवन तेवढेच सोयीस्कर झाले पण नंतरच्या काळामध्ये श्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे त्यामुळे अनेक अशोक चव्हाण समर्थक भाजपमय झाले यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मोठी गळती लागली असून यातच श्री वसंत चव्हाण यांनी काँग्रेसवर विश्वास ठेवून काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय पक्का केला असता आणि श्री वसंत चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिल्ह्यातील माजी आमदार विद्यमान आमदार यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते पदाधिकारी यांनी काँग्रेसमध्ये राहूनच काँग्रेसला बळ देण्याचे काम करीत आहेत. यामुळेच नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामीण व शहरी भागातून मोठ्या प्रमाणात काँग्रेसला सहानुभूती असल्याचे जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. त्यामुळेच नांदेड जिल्ह्यातील जनतेने काँग्रेस नेतृत्वाला स्वीकारले असेच म्हणावे लागेल शेवटी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार श्री वसंत चव्हाण यांनी जिल्ह्यातील जनतेला केंद्रस्थान मानून नांदेड लोकसभेसाठी रिंगणात उडी घेतली आहे नांदेड लोकसभेमध्ये काँग्रेसला मोठ्या प्रमाणात सहानुभूतीच्या जोरावर मोठ्या प्रमाणात जनाधार मिळत असून व प्रतिसाद ही तितकाच मिळत आहे अशा चर्चां होताना दिसून येत आहे.
जिल्ह्यातील मराठा समाजाच्या तीव्र विरोध भाजपला होत असून त्यांचाच फायदा व मराठा समाजाचे मताधिक्य काँग्रेसच्या पारड्यात जाण्याची शक्यता दिसून येत आहे. आणि सध्या परिस्थितीत नांदेड लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीला फारसा फायदा होताना दिसून येत नाही कारण वंचित उमेदवार अविनाश भोसेकर यांनी जिल्ह्यात परिचित नसल्याने त्यांना वैयक्तिक पसंती दिसून येत नाही वंचित आघाडी म्हणून जरी मते मिळाली पण लिंगायत समाजाचे जिल्ह्यात प्राबलले मोठे जरी नसते तरी त्या समाजाचे मोठे विभाजन होऊन त्यातच वंचित बहुजन आघाडी काँग्रेस व भाजपमध्ये विभाजन होण्याची शक्यता दाट दिसून येत आहे. आणि दलित समाजाचे मत विभाजन हे काँग्रेस व वंचित मध्ये आणि काही प्रमाणात भाजपमध्ये होण्याची सुद्धा शक्यता दिसून येत आहे. तर मुस्लिम समाजाची सर्वाधिक मोठी पसंती ही काँग्रेसच्या बाजूने असून जिल्ह्यातील मुस्लिम मताधिक्यांचा मोठा फायदा हे काँग्रेसला होण्याची शक्यता दिसून येत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या तिढा न सुटल्याने याचाच फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. आणि मराठा समाजाच्या आंदोलन स्थळी समाजाच्या युवकावर व महिलावर अमानुषपणे लाठीचार्ज व सरकारची मराठा समाजाविषयी असलेली चालढकलपणा आणि मराठा समाजाविषयी वेळ काढू पणा करत असल्याने मराठा समाजाला सखे सोयरे यांची अंमलबजावणी केल्याने, आणि मराठा समाजाची मोठ्या प्रमाणात दिशाभूल केल्याने, भाजप विषयी तीव्र नाराजी असल्याचे दिसून येत आहे व जनतेमधून सांगण्यात येत आहे. याचाच फटका भाजपला बसण्याची दाट शक्यता असल्याची माहिती जनतेकडून मिळत आहे.
विशेषता भाजपाने करत असलेली फोडाफोडीचे राजकारणावर जनतेचा असंतोष असल्याचे सांगण्यात येत आहे भाजपा ही देशातील प्रादेशिक पक्ष फोडून नेते फोडून सत्ता करू पाहते आहे पण या फोडाफोडीच्या राजकारणावर जनतेचा मोठा असंतोष असल्याने जनतेच्या ते जिव्हारी लागले असे जनतेकडून सांगण्यात येत आहे. भाजपा ही संविधान विरोधी वक्तव्य करणं व फोडाफोडी उद्योगधंदे पळविणे शेतकऱ्यांना हमीभाव न देणे नोकर भरती न करणे यासारख्या गोष्टीची चिड जनतेच्या मनात असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणून नांदेड लोकसभा मतदारसंघाचे याचे मोठ्या प्रमाणात पडसाद उमटले असून जनतेचा रोष हे भाजपा कडे आहे. म्हणून नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजप आणि तळ ठोकून बसले आहे. मात्र निवडणूक लागल्यापासून ते आज पर्यंत जनतेचा कॉल मात्र काँग्रेसच्या पारड्यात जाताना दिसून येत आहे असा अंदाज सध्या परिस्थितीत दिसून येत आहे. जनतेचा कौल काँग्रेसच्या पडद्यात जात असल्याने भाजपला वारंवार नांदेडमध्ये सभा घ्याव्या लागत आहे व काँग्रेसची धसकी भाजपला बसली आहे का? असे प्रश्न आता जनतेमध्ये होताना दिसून येत आहे.
नांदेड लोकसभा निवडणुकीत एकूण 23 उमेदवार रिंगणात असून ही लढत मात्र तिरंगी होण्याची दाट शक्यता मानली जात आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघाचे मुख्य लढत ही काँग्रेस व भाजपमध्ये होत आहे.