वजीराबाद गुन्हे शोध पथकाची कामगिरी
नांदेड जिल्हा प्रतिनिधीसंजीवकुमार गायकवाड
नांदेड : शहरामध्ये मोटरसायकल चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेता श्रीकृष्ण कोकाटे,पोलीस अधिक्षक, नांदेड,अबिनाश कुमार,अपर पोलीस अधिक्षक,नांदेड,सुरज गुरव,उप विभागीय पोलीस अधिकारी,उप विभाग, नांदेड शहर,यांनी अभिलेखावरील मोटरसायकल चोरी करणारे गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांचेकडे बारकाईने तपास करुन मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबतच्या सुचना गुन्हे बैठकीमध्ये दिल्या होत्या.
सदर सुचनांचे अनुषंगाने अशोक घोरबांड,पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे वजीराबाद,नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली वजीराबाद गुन्हे शोध पथकाचे श्री. शिवराज जमदडे,सहा.पोलीस निरीक्षक, पोना/2085 विजयकुमार नंदे, पोना / 1353 शरदचंद्र चावरे, पोना / 152 मनोज परदेशी, पोकॉ/3088 बालाजी कदम, पोकों/2896 शेख इम्रान, पोकॉ/2616 अरुण साखरे, पोकॉ/14 भाऊसाहेब राठोड,पोकों/ 3136 रमेश सुर्यवंशी यांनी शहरातील मोटरसायकल चोरीस जाण्याचे प्रमाण ज्याठीकाणी जास्त आहे.
अशा ठीकाणी सापळे (Trap) रघुन जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्याचे निश्चीत केले.त्याप्रमाणे विविध ठीकाणी सापळे रचुन चोरटयंचा शोध घेणे चालु होते.
काल दिनांक 18.07.2023 रोजी नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी जिल्हा परीषद कार्यालयाचे आवारात सापळा रचुन चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी जिल्हा परीषदेच्या आवारामध्ये एक इसम संशयास्पद हालचाली करीत असतांना दिसुन आला. त्यावरुन त्यास ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत असतांना तो भिंतीवरुन उडी मारुन पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असतांना त्यास पाठलाग करुन पकडले. त्यास त्याचे नांवगांव विचारणा करुन त्याचे ताब्यातील मोटरसायकल बाबत विचारणा करता त्यांनी आपले नांव आनंदा नामदेव जाधव,वय 25 वर्षे व्यवसाय वाहन चालक राहणार शिरुर (चौकी) ता.कंधार जि. नांदेड असे सांगितले.त्याचे ताब्यातील मोटरसायकल बाबत तो समाधानकारक उत्तरे देत नसल्याने त्यास विश्वासात घेऊन विचारणा करता त्यांनी सदर मोटरसायकल 15 दिवसापूर्वी रेल्वेस्टेशन परीसरातून चोरी केल्याचे सांगितले.
त्यावरुन नमुद ईसमास अधिक विश्वासात घेऊन विचारणा करता त्यांचेकडुन रेल्वेस्थानक परीसरात ठेवलेल्या चोरीच्या दोन मोटरसायकली,परसराम तांडा ता. लोहा येथे विक्री केलेली एक मोटरसायकल तसेच आलुवडगांव ता. नायगांव येथे विक्री केलेल्या तीन मोटरसायकली अशा एकुण सात मोटरसायकली किंमती 2,35,000/- रुपयांच्या सदर चोरट्यांकडुन हस्तगत केल्या आहेत.
सदर प्रकरणी पोलीस ठाणे वजीराबाद, नांदेड येथे 01 ) गु.र.न. 267/2023 कलम 379 भारतीय दंड विधान, 02.) गु.र.न. 283/ 2023 कलम 379 भारतीय दंड विधान, 03.) गु.र.न. 2680/2019 कलम 379 भारतीय दंड विधान गुन्हे दाखल असल्याचा अभिलेख आहे. सदर मोटरसायकल चोरटयाकडुन अधिक चोरीच्या मोटरसायकली हस्तगत होण्याची शकयता आहे.
वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मोटरसायकल चोरटास पकडुन चोरीचे गुन्हे उघडकीस आणल्याबद्दल वरीष्ठांनी त्यांचे कौतुक केले आहे