मोदी-शाहने भारतीय संविधान बदलण्यासाठी चारशे पारचा नारा दिला- प्रा.रामचंद्रजी भरांडे

abhishek bakkewad
4 Min Read
Spread the love

प्रतिनिधी लक्ष्मण भैरेवाड 

हिमायतनगर – शहरातील परमेश्वर मंदीरसमोरील बसस्थानक परिसरात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारार्थ सभा उशीरा सायंकाळी आठ वाजता सुरु झाली होती. महाविकास आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्याचा सत्कार होऊन काहीची भाषणे रात्री ०९:३० वाजेपर्यंत पर्यत झाली होते.

 

प्राध्यापक रामचंद्रजी भरांडे सर आपल्या मनोगतात म्हणाले की, नरेंद्र मोदीनी व अमित शहा यांनी जो नारा दिला अब की बार चारसौ पार ,म्हणजे भारतीय संविधान बदलण्यासाठी हे सगळे षडयंत्र आहे.आता मतदारांनी ओळखले पाहिजे. ते आम्ही सर्व अभ्यास करुन, अखेर बिनशर्त जाहीर पाठिंबा आमच्या संघटनेचा दिला आहे.आपण सर्व मिळुन महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणुया असे आवाहन केले आहे. प्रा.नितीन बानगुडेचे भाषण सुरु झाले आणि मोठ्या पावसाला सुरुवात झाली.पडत्या मोठ्या पावसात भाषण चालू असतांना समोरील कार्यकर्त्याचा टाळ्याचा कडकडाट सुरु होता.त्यांच्या आवेश पूर्ण भाषणाने सर्वांना खिळून ठेवले होते.प्रचार सभेला संबोधित करतांना प्रा. नितीन बानगुडे पाटील म्हणाले,ही लोकसभेची निवडणूक गद्दारांना धडा शिकविण्यासाठी असून संविधान रक्षणासाठीचीआहे.पूर्वी राजाचा जन्म राणीच्या पोटातून होत होता.आता राजाचा जन्म मतपेटीतुन होत आहे. २०१९ च्या निवडणूकीत मांजरीची पिल्ल जन्मताच म्हणत होती.अच्छे दिन! अच्छे दिन!! पण आता २०२४च्या निवडणूकपूर्वीच डोळे उघडल्या नंतर तिच पिल्ल म्हणायला लागली बुरे दिन! बुरे दिन!! शेतकर्‍यांच्या शेतीउपयोगी खते औषधे बी बियाणे सर्व काही टॅक्स फ्री मिळत होते.परंतु भाजप पक्षाच्या काळात आठरा टक्के जीएसटी भरावी लागत आहे. जीएसटीतून लुट करायची आणि शेतकरी सन्मान निधी सहा हजार द्यायचा हे मतदाराने ओळखावे असे आव्हान करुन शेतकर्‍यांना हमीभाव ही दिला नाही .महागाई, बेरोजगारी,भाववाढ, यामुळे जनता वैतागली आहे. तेव्हा भारताच्या संसदेत महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांचे एक नंबरचे बटन दाबून विजय करा असे आव्हान प्रा. नितीन पाटील बानगुडे यांनी भर पावसातील सभेत केले. हिमायतनगर बस स्थानकातील महाविकास आघाडीचे हिगोली उमेदवार माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारार्थ सभा आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी व्यासपीठांवर शिवसेना ठाकरे गटाचे व्याख्याते तथा मुख्य वक्ते प्रा. नितीन बानगुडे पाटील,जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात, उमरखेडचे माजी आमदार विजय खडसे,लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्र भरांडे सर,शिवसेनेचे सचिन चराटे,ज्ञानेश्वर भवर,ठाकरे गट शिवसेना तालुकाप्रमुख अध्यक्ष विठ्ठल ठाकरे, काँग्रेसचे ता.अध्यक्ष गजानन सुर्यवंशी,माजी जि.प.सदस्य सुभाष दादा राठोड,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ता.अध्यक्ष प्रा.सुनिल पतंगे,सभापती कृषी उत्पन्न बाजार समितीचे जनार्धन ताडेवाड, शिवाजी पाटील,सरपंच संघटना तालुकाध्यक्ष परमेश्वर गोपतवाड,सरपंच बालासाहेब पाटील,माजी नगराध्यक्ष अब्दुल अखिल,माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड,लोकस्वराज्य आंदोलनाचे बाळासाहेब टिकेकर डौरकर, धोंडोपंत बनसोडे, सदानंद ऐरणकर पार्डीकर,रफीक सेठ, शिवाजी माने,डाॅ.प्रकाश वानखेडे,संतोष आंबेकर,शहराध्यक्ष संजय माने,प्रविण कोमावार,ज्ञानेश्वर शिंदे,गोविंद शिंदे आदी सह कार्यकर्ते होते. प्रस्ताविक प्रा.सुनिल पतंगे यांनी केले.शिवसेनेचे सचिन सराटे, लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्रजी भरांडे सर यांनी आपल्या समर्थकांसह बिनशर्त जाहीर पाठींब्याचे पत्र महाविकास आघाडी पक्षाच्या उमेदवारास शिवसेना ठाकरे गटाचे व्याख्याते प्रा.नितीन बानगुडे पाटील यांच्याकडे दिले आहे.यावेळी आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी आमदार विजय खडसे म्हणाले,ही निवडणूक मतदाराने महागाई,भाववाढ,बेरोजगारीमुळे मनावर घेतली आहे.मोदी चारसे पार नाहीआता तडीपार असा उलेख करुन भ्रष्टाचार केलेल्या नेत्यांना भाजपात घेतले जात आहे.असा आरोप सुद्धा केला आहे.त् संविधान वाचविण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवहान केले.आमदार माधवराव जवळगांवकर यांनी महायुतीच्या उमेदवारांवर सडकुन टिका केली तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आव्हान केले. सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन गोविंद शिंदेनी केले.

Share This Article
error: Content is protected !!