महाराष्ट्रात ८ लोकसभा मतदार संघासाठी मतदान
१३ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील ८८ जागांसाठी मतदान
नवी दिल्ली – संपूर्ण देशभरामध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान (2024) पार पडत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठी भाषेमध्ये युवा आणि महिलांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
त्यांनी युवा आणि महिलांना मतदानाचा नवा विक्रम निर्माण करण्याचं आवाहन केलंय. देशभरामध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानाचा उत्साह दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात, आज मतदान होत असलेल्या, मतदारसंघामधील सर्वांना विक्रमी संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करतो. मतदानाचे प्रमाण वाढल्याने आपली लोकशाही बळकट होते. विशेषतः आपल्या युवा आणि महिला मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे माझे आवाहन आहे. तुमचे मत म्हणजे तुमचा आवाज!, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं
महाराष्ट्रात ८ लोकसभा मतदार संघासाठी मतदान
महाराष्ट्रात दुसऱ्या टप्यातील ८ लोकसभा मतदार संघासाठी आज मतदान होत आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी यंत्रणा सज्ज आहे. राज्यातील बुलडाणा, अमरावती, अकोला, वर्धा, हिंगोली, यवतमाळ-वाशीम, नांदेड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघांत आज 26 एप्रिल रोजी मतदान होत आहे. आठ मतदारसंघांमध्ये अटीतटीची लढाई होत आहे. नांदेड मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाची कसोटी पणाला लागली (PM Modi News) आहे. तर अकोल्यातून निवडणूक लढत असलेले वंचितचे प्रकाश आंबेडकर यांची प्रतिष्ठा देखील पणाला लागली आहे.
१३ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील ८८ जागांसाठी मतदान
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे. १३ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील ८८ जागांसाठी आज मतदान होणार आहे. केरळमधील सर्व जागांवर आज मतदान होत आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, काँग्रेस नेते राहुल गांधी, अभिनेत्री हेमा मालिनी, शशी थरुर यांच्यासह अनेकांची प्रतिष्ठा आज पणाला लागलेली आहे.