नांदेड प्रतिनिधी/अशोक वाघमारे
नांदेड – नायगाव तालुक्यातील मौजे हुस्सा येथील एका वराने व 100 वर्षीय महिलेने बजावला मतदानाचा हक्क. 16 नांदेड लोकसभा मतदारसंघात दिनांक 26/ 4/ 2024 रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी एका नव वर तुळशीराम आनंदा वाघमारे यांनी थेट भवल्यावरून मतदान केंद्र गाठत बजावला मतदानाचा हक्क व हुस्सा येथील माजी उपसरपंच शेषराव दत्तराव हंबर्डे यांच्या मातोश्री रुक्मिणीबाई दत्तराव हंबर्डे यांनी 100 व्या वर्षी बजावला मतदानाचा हक्क भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाऱ्यांच्या जोरावर गावातील नवयुवक महिला पुरुष वयोवृद्ध यांनी एन उन्हाच्या पऱ्यात जीवाची परवाना करता मतदानासाठी सरसावले आहे.
सदर निवडणुकीत नांदेड लोकसभेसाठी तिरंगी लढत झाल्याचे चित्र दिसून आले आहे यात प्रामुख्याने काँग्रेस,भाजपा,व वंचित यांच्यात मुख्य लढत झाली असून या निवडणुकीत प्रत्येक पक्षाने आपली प्रतिष्ठापनाला लावली होती. यात भाजप पक्षाकडून देशाचे गृहमंत्रीअमित शाह,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,व देशाचे मंत्री नितीन गडकरी,आणि राज्याचे उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडवणीस,राज्याचे माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण, खा. अजित गोपचेडे, खासदार चिखलीकर,आमदार राजेश पवार, आ. राम पाटील रातोलीकर, आ कल्याणकर, व जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर दुसरीकडे काँग्रेसकडून भावी खासदार म्हणून असणारे श्री वसंत चव्हाण माजी मंत्री अमित देशमुख, खा हांडेरे, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले, आमदार धीरज देशमुख,आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर आमदार मोहन अण्णा हंबर्डे माधवराव पाटील शेळगावकर सह काँग्रेस महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर वंचित बहुजन आघाडीचे श्री अविनाश भोसीकर सह पदाधिकारी कार्यकर्ते व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड बाळासाहेब आंबेडकर यांची प्रतिष्ठापनाला लागली होती. सदर निवडणूक प्रत्येक पक्षाने आपापले प्रतिष्ठा आपणाला लावत व झंजावती प्रचार दौरे बैठकी लावून निवडणुकीला पुढे गेले तर सदर प्रचार सभे व बैठकीदरम्यान जिल्ह्यातील मतदारांना आश्वासित करून भावनिक साथ देखील घालण्यात आल्याचे दिसून आले होते. मात्र जिल्ह्यातील मतदाता हे कोणाच्या पारड्यात आपले बहुमूल्य मत टाकले याची उत्सुकता मात्र कायम आहे. चार जून रोजी स्पष्ट होणार असून जिल्ह्यातील कार्यकर्ते पदाधिकारी यांची धाकधूक मात्र कायम असल्याचे दिसून येत आहे.
सदर निवडणुकीत 89 नायगाव विधानसभा मतदारसंघातून एकूण मतदान55 .08% झाले तर भोकर मध्ये 53.38% झाले, देगलूर व बिलोली मध्ये 51. 45% व नांदेड उत्तर मध्ये 52.35% तर नांदेड दक्षिण मध्ये 52.48% आणि मुखेड तालुक्यात 50.09% मतदान झाले आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघात एकूण 59.57% मतदान झाले आहे.सदर निवडणुकीत नायगाव तालुक्यातून एकूण 349 मतदान केंद्रावर मतदान झाले असून यात नायगाव तालुक्यातील मोजे येथील एकूण मतदान 1398 पैकी झालेले मतदान 979 झाले आहे. या निवडणुकीत महिला मतदारांनी एकूण 441 तर पुरुष मतदाराने एकूण 517 मतदाता आणि मतदान केले आहे. तर उत्साह येतील एकूण मतदानाची टक्केवारी पाहता 69.95 टक्के झाले असून हुस्सा येथील एकूण 979 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीत सर्वत्र ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये व शांततेत मतदान पार पडले आहे.