पानसरे शाळेची विद्यार्थिनी कराटे स्पर्धेत राज्यात प्रथम व द्वितीय

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर द्वारे आयोजित 19 वर्षे खालील मुले /मुली या शालेय राज्यस्तरीय हाफकिडो बॉक्सिंग या प्रकारात विजयसिंह मोहिते पाटील सभागृह (राजवाडा) मोडनिंब, तालुका माढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी दिनांक 27 एप्रिल 24 रोजी या स्पर्धा संपन्न झाल्या या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री नरेंद्र पवार साहेब जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूर यांच्या हस्ते झालेल्या या स्पर्धेत धर्माबाद येथील पानसरे शाळेच्या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवून शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्या खेळाचे प्रदर्शन दाखवत शरयूू सीतावार (51 किलो खालील गटात) हि राज्यात प्रथम येत सुवर्णपदक तर श्रावणी होट्टे(36 किलो खालील गटात), शुभांगी (39 किलो खालील गटात), सावली वाघमारे(45 किलो खालील गटात), रागिणी पांचाळ (33 किलो खालील गटात), शर्वरी सीतावार (63 किलो खालील गटात) या पाच विद्यार्थिनींनी राज्यात द्वितीय येण्याचा बहुमान पटकावत रजत पदकांची कमाई करत विद्यार्थिनींनी यशश्री खेचून आणत जिल्ह्यातून / विभागातून आणि आता राज्यातून प्रथम व द्वितीय येण्याचा बहुमान मिळवत यशाची परंपरा कायम ठेवत धर्माबाद शहराचे व शाळेचे नाव हे संपूर्ण महाराष्ट्रात गाजवले या यशाबद्दल सर्व विद्यार्थिनींचा शालेय समिती मुख्याध्यापक व संचालक यांच्याकडून अभिनंदन करण्यात आला या सर्व विद्यार्थिनींना ड्रॅगन मार्शल आर्ट अकॅडमीचे ग्रँडमास्टर दत्तात्रेय सीतावार यांचे मार्गदर्शन लाभले तसेच माजी सैनिक क्रीडा शिक्षक श्री संजय पंदिरवाड व शाळेतील वरिष्ठ शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे पालक व जिल्ह्यातील सर्व क्रीडा प्रेमी तर्फे अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

Share This Article
error: Content is protected !!