शिक्षक बैस यांचा सेवानिवृत्ती निमित्त गौरव;सहृदय निरोप

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी /बजरंगसिंह हजारी

नांदेड : तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रुई येथील सहशिक्षक आर.डी. बैस हे दिनांक ३१ मार्च रोजी ३२वर्ष ज्ञानदानाचे महत्त्वपूर्ण कार्य पार पाडून सेवानिवृत्त झालेत.त्यानिमित्ताने त्यांचा सेवापूर्ती

 

गौरव सोहळा मंगळवार दि.३० एप्रिल रोजी दुपारी शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे केंद्रप्रमुख संतोष मोहन चव्हाण यांचे प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मानासह गौरविण्यात येऊन उत्साहात साजरा करण्यात आला.

आदिवासीबहुल किनवट तालुक्यातील विदर्भ प्रांत व तेलंगणा राज्याच्या सिमेलगत असलेल्या मांडवी शहर परिसरातील जवरला-पाटोदा ही सेवानिवृत्त शिक्षक रघुविरसिंह बैस यांची जन्मभूमी तर माहूर ही त्यांची कर्मभूमी होय.अत्यंत मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्व आणि शिस्तबद्ध पद्धतीचे शिक्षक म्हणून सामाजिक जीवनात व शैक्षणिक क्षेत्रात बैस यांना किनवट, माहूर तालुक्यासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यात ओळखले जाते.

आदिवासीबहुल अशा डोंगराळ परिसरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक

 

गुणवत्ता वाढीसाठी व अध्यापनासाठी विशेष लक्ष देऊन शिक्षणाचे योग्य धडे देण्याचे बहुमुल्य योगदान शासकीय सेवेच्या माध्यमातून बैस यांनी यशस्वीपणे पार पाडले आहे.म्हणूनच त्यांना विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांसह त्यांच्या तमाम पालकवर्गात देखिल ओळखले जाते.या दरम्यान अनेक शैक्षणिक उपक्रम त्यांनी सेवानियुक विविध शाळेत राबविले आहेत.माहूर,किनवट सारख्या अत्यंत मागासलेल्या भागातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीची तळमळ नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. विद्यार्थी वाढीसाठी विशेष प्रयत्न,वेळोवेळी गटसंमेलने व इतर सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात देखील बैस यांचा सिंहाचा वाटा होता हे येथे विशेष उल्लेख करण्यासारखे आहे.३२ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात शिक्षक रघुनाथसिंह बैस यांचा सपत्नीक सत्कार सन्मान करत भेटवस्तू व जोड आहेर देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येऊन शिक्षकवृंद व कार्यालयीन स्टॉफच्यावतीने सहृदय निरोप देण्यात आला.

यावेळी बैस यांच्या शैक्षणिक कार्यकाळातील अनेक जुन्या स्मृतींना उजाळा देत केंद्रप्रमुख संतोष चव्हाण, मुख्याध्यापक संजीव वाठोरे,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे माहूर तालुकाध्यक्ष शेषराव पाटील,माला मानकर, श्याम राठोड,अरविंद जाधव,रंजीत वर्मा,अनंत वर्मा, सुनील कांबळे,प्रदीप पाटील,ललिता जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचलन अरुण धकाते यांनी केले.शिक्षक आर.डी.बैस यांच्या सेवानिवृत्ती निरोप कार्यक्रमात केंद्रातील सर्व शिक्षक,शिक्षिका,

कर्मचारी,विद्यार्थी,मोठ्या संख्येने

 उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!