गुरुद्वारा सचखंड बोर्डातर्फे 67 वा सामुहिक विवाह महोत्सव दि. 11 आणि 12 मे 2024 रोजी आयोजन

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड शहरातील गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्डातर्फे आदरणिय पंजप्यारे साहिबान यांच्या सरप्रस्तीमध्ये व गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे माननिय प्रशासक डॉ.विजय सतबिर सिंघ जी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दि. 11 व 12 मे 2024 रोजी 67 वा सामुहिक विवाह महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.या सामुहिक विवाह महोत्सवामध्ये 12 जोडपी धार्मिक रीति प्रमाणे विवाह बध्द होणार आहेत. हा कार्यक्रम श्री गुरु ग्रंथ साहिब जी भवन मध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी गुरुद्वारा सचखंड बोर्डातर्फे माननिय प्रशासक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी करण्यात आलेली असून या दोन दिवसीय कार्यक्रमामध्ये दि. 11 मे रोजी सगाई (शगन) व दि. 12 मे 2024 रोजी लावांफेरे (अक्षदा) संपन्न होणार आहेत. या कार्यक्रमाध्ये गुरुद्वारा बोर्डाचे सर्व अधिकारी, विभाग प्रमुख, व कर्मचाऱ्यांची सेवा लावण्यात आलेली आहे. 

जेणे करुन हा कार्यक्रम यशस्वी रीत्या संपन्न व्हावा. कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांना,धार्मिक,प्रतिष्ठीत, सामाज सेवक,विविध संघटना, नांदेड येथील प्रशासकिय अधिकारी व सर्व पक्षांच्या मान्यवरांना या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून नवदाम्पत्यांना आशिर्वाद देण्यासाठी निमंत्रण पाठविण्यात आलेले आहे. तरी सर्वांना विनंती करण्यात येते कि, गुरुद्वारा बोर्डातर्फे आयोजित सामुहिक विवाह महोत्सवामध्ये उपस्थित रहावे अशी विनंती

 

अधिक्षक गुरुद्वारा सचखंड बोर्ड, नांदेड,यांनी केली आहे.

Share This Article
error: Content is protected !!