श्री क्षेत्र राहेर येथे श्री दत्तप्रभू व श्री चक्रधर स्वामी यात्रेमध्ये खुलेआम मटका व जुगार अड्डा व देशी विदेशी दारू चालू……..

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

 नांदेड प्रतिनिधी /अशोक वाघमारे 

 नांदेड – यगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र राहेर येथे श्री दत्तप्रभू व श्री चक्रधर स्वामी यांची यात्रा व पालखी सोहळा व श्री चक्रधर स्वामी यांची काठी घोडेस्वारी महाआरती व भव्य कुस्त्यांची दंगल हे गेले आठशे वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आहे. सातत्यपूर्ण चालत आहे या यात्रेसाठी महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटका येथून भाविकांनी अलोट गर्दी करून दर्शनासाठी येत असतात व भाविकांचे मोठे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र राहे रे ते श्री चक्रधर स्वामी यांच्यावर असलेली निश्चिम भक्ती व असलेले भाविकांचे श्रद्धास्थान यामुळे दरवर्षी ही यात्रा तब्बल पाच दिवस चालू असते.

        सदर यात्रा दिनांक 30/ 4/ 2024 पासून सुरू झालेली ती दिनांक 3/ 5 /2024 पर्यंत ही यात्रा चालू असते. ही यात्रा भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र राहेर नगरीमध्ये मटका व जुगार अड्डा व देशी विदेशी दारू खुलेआम चालू असून यामुळे यात्रेमध्ये भाविकांची गर्दी कमी मात्र जुगार अड्डे खेळणाऱ्यांचीच गर्दी जास्त असल्याचे दिसून आले आहे. येथील युवक व वयोवृद्ध यांनी रात्रंदिवस नशा करून जुगार अड्ड्यावर हजारो रुपयांची उधळण करत आहे. श्री क्षेत्र राहेर हे कुंटूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पोलीस चौकी आहे आणि येथील बीट जमादार यांना जणू काही आनंदच झाल्याचे सांगण्यात येत आहे त्यांच्या आशीर्वादाने या भागात मोठ्या प्रमाणात आहे व त्या देशी विदेशी आणि मटका जुगार वाल्यांना पाठबळ देत असल्याची चर्चा होताना दिसून येत आहे.

 

         सदर मटका व जुगार खेळण्यात तरुणांचा मोठा सहभाग असल्याचे दिसून आले आहे त्यामुळे या राहे या ठिकाणी वीट भट्टी कामगार परिसरातील असंख्य तरुण वयोवृद्ध व्यक्ती दारूच्या नशेमध्ये बेहबान होऊन आणि स्वतः केलेल्या काबाड कष्टाच्या पैशाचे मटका व जुगार अड्डा वर जाऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक उधळण करत असल्याची चित्र दिसून आले आहे यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून पहिलेच वीट भट्टी कामगार हे आर्थिक संकटात असून आणि त्यात अशा मटका व जुगार आणि देशी-विदेशी दारू विक्रेत्यांनी मात्र कामगारांच्या खिशाला कात्रण लावल्याचे दिसून आले आहे. एकीकडे वीट भट्टी कामगार व इतर कामगार यांनी आपले आर्थिक बाजू भक्कम करण्याकरिता बाहेर गावाहून आलेले अनेक संसार राहेर येथे थाटले असून उन्हातानात काम करून कमावलेला पैसा हे दुसरीकडे मात्र अशा भागातील कुंटूर येथील मटका जुगार चालक व राहेर येतील पण टपरी वाले देशी दारू विक्री करून कामगाराच्या खिशाला कात्रण लावल्याचे दिसून येत आहे.

 

         तरी या प्रकारची माहिती संबंधित पोलीस स्टेशन यांना असून देखील जाणून-बुजून याकडे दुर्लक्ष करून अवैध धंदे चालवणाऱ्यालापाठबळ देत असल्याची चर्चा जनतेमध्ये होताना दिसून येत आहे मात्र भाविकांनी याकडे तीव्र संताप व्यक्त केला आहे व मटका व जुगार दारू विक्री त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Share This Article
error: Content is protected !!