खुनासह आठ घर फोडयामध्ये फरार अट्टल गुन्हेगारास अटक

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

 

नविन 05 घरफोडीचे गुन्हे उघड स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडची कामगिरी

 

खुनासह आठ घर फोडयामध्ये फरार अट्टल गुन्हेगारास अटक

नविन 05 घरफोडीचे गुन्हे उघड

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – जिल्यात खुनासह आठ घरफोडीच्या चोऱ्यांच्या गुन्हयातील फरार अट्टल गुन्हेगारांस अटक करून जेरबंद करण्याची कारवाई पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेशाखा नांदेड पोलिसांकडून करण्यात आली आहे.

नांदेड जिल्हयात घडत असलेल्या गुन्हयांना आळा बसणेकामी व माली गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांना अटक करण्याबाबत पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे साहेब यांनी पोलीस निरीक्षक उदय खंडेराय,स्था.गु.शा., नांदेड यांना आदेशीत केलेनुसार पोलीस निरीक्षक,स्थागुशा, नांदेड यांनी मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आनन्यासाठी पथके तयार करुन सूचना दिल्या होत्या.

त्या अनुषंगाने माली गुन्हयासंबंधाने माहिती घेत असतांना स्थानिक गुन्हे शाखेतील पथकातील अधिकारी यांना एक खुनाचा गुन्हा व आठ घरफोडीच्या गुन्हयामधील फरार आरोपी नामे संतोष ऊर्फ चॉकलेटया बापुराव भोसले, वय 45 वर्ष, रा.कुरुळा ह.मु.वहाद, ता.कंधार जि. नांदेड हा त्याचे राहते गावी वहाद ता.कंधार येथे आसल्याची गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा,नांदेड येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावून मिळालेल्या माहितीप्रमाणे जावुन त्याचा शोध घेतला असता आरोपी नामे संतोष ऊर्फ चॉकलेटया बापुराव भोसले,वय 45 वर्ष, रा. कुरुळा ह.मु. वहाद, ता. कंधार जि. नांदेड हा मिळुन आला त्यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्याने खालील प्रमाणे गुन्हे केल्याचे कबुल केले आहे.

1) पो.स्टे. मुखेड गुरनं 07/2024 कलम 457,380 भादंवि 2) पो.स्टे. मुखेड गुरनं 37/2024 कलम 457,380 भादंवि 3) पो.स्टे. मुखेड गुरनं 115/2024 कलम 457,380 भादंवि 4) पो.स्टे. देगलूर गुरनं 157/2024 कलम 457,380 भादंवि 5) पो.स्टे.कंधार गुरनं 363/2023 कलम 457,380 भादंवि नुसार नमुद आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आली आहेत.

 वरील गुन्हयातील सदर आरोपींकडून मुद्देमाल 48 ग्रॅम सोन्याचे दागिने,200 ग्रॅम चांदीचे दागिणे व नगदी 21,000/- रुपये असा एकूण 3,73,200/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. वर नमूद आरोपीस पुढील तपासकामी पो.स्टे. मुखेड येथे देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी श्रीकृष्ण कोकाटे,पोलीस अधीक्षक, नांदेड,अबिनाश कुमार,अपर पोलीस अधीक्षक,नांदेड, खंडेराव धरणे,अपर पोलीस अधीक्षक,भोकर यांचे मार्गदर्शनाखाली उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक,स्था.गु.शा, नांदेड, सपोनि रवि वाहुळे, सपोउपनि माधव केंद्रे,पोहेकों/गुंडेराव करले,पोना/ संजीव जिंकलवाड,पोकों देविदास चव्हाण,पोकों/ रणधिरसिंह राजबन्सी,पोकों/मोतीराम पवार, पोकों/ ज्वालासिंघ बावरी, पोकों/गजानन बयनवाड,पोकों/बालाजी यादगिरवाड,चापोकॉ कलीम शेख,चापोकों/हनुमानसिंह ठाकूर यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले आहे

Share This Article
error: Content is protected !!