तात्काळ शस्त्रक्रियेची गरज
नांदेड जिल्हा प्रतिनिधी/बजरंगसिंह हजारी
माहूर – युनायटेड स्टेट्स डिपार्ट्मेंट ऑफ अॅग्रीकल्चर (यूएसए) नुसार, भारत हा जगभरात सर्वाधिक गायी असलेला देश आहे. हा देश “पवित्र” असल्याने गुरांचे तंतोतंत संरक्षण करतो.
परंतु,याच भारत देशातील महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यातील माहूर गडावरील एका गोशाळेतील मोकाट सोडलेली गाय गत पंधरा ते वीस दिवसांपासून पाय मोडलेल्या अतिशय गंभीर जखमी अवस्थेत शस्त्रक्रियेअभावी अनुसया माता मंदिर येथे तेथील कर्मचारी व दुकानदारांच्यावतीने करण्यात येत असलेल्या चारा-पाण्यावर कसेबसे जिवंत राहून शेवटची घटका मोजत आहे.केवळ या भोळ्या भाबड्या आशेवर कि,एक दिवस तरी आपला संगोपन करणारा गो-शाळा मालक येईल व आपला ईलाज करून आपणास परत आपल्या गो-शाळेत घेऊन जाईल म्हणून चातकासारखी वाट पाहत आहे.
हिंदू धर्मात, गाय एक पवित्र प्राणी मानली जाते आणि ती संपत्ती, शक्ती आणि मातृप्रेमाचे प्रतीक आहे.हे दैवी आणि पौष्टिक माता देवीचे पृथ्वीवरील प्रतिनिधी असल्याचे मानले जाते, जी प्रजनन आणि उदारता दर्शवते. असे मानले जाते की त्यांच्या दुधाचा मानवी शरीरावर शुद्धीकरण प्रभाव पडतो.
दुधाच्या माध्यमातून आपल्याला बटर, चीज, दही आणि बरेच काही मिळते. याव्यतिरिक्त, लोक त्यांच्या शेण आणि गायीच्या चामड्यासाठी गायींचा वापर करतात. शेणखत एक समृद्ध खत म्हणून उपयोगी पडते. शिवाय, गायीचे चामडे आपल्याला सोल्स, बेल्ट, कार सीट आणि बरेच काही देते. “
गोमूत्राला देखील विशेष धार्मिक व वैद्यकीय महत्त्व आहे. गोमय(गाईचे शेण), गोमूत्र(गाईचे मूत्र), गाईचे दूध, दही, तूप यांच्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात.
गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यास केंद्र सरकारला सांगितल्यानंतर राजस्थान उच्च न्यायालयाने म्हटले की, गायीच्या आत ३३ कोटी देवी-देवतांचा वास असल्याचे मानले जाते. “गाय हा एकमेव जीव आहे जो ऑक्सिजन घेतो आणि ऑक्सिजन सोडतो…
असे बहुउपयोगी, बहुमुल्य महत्त्व प्राप्त असलेली एक गाय सध्या गत पंधरा ते वीस दिवसांपासून माहूर गडावरील भगवान प्रभु दत्तात्रेय यांची माता असलेल्या दत्त शिखर मंदिर लगतच्या अनुसया माता मंदिर येथे मागचा डाव्या पायाचे हाड गुडघ्यातून अक्षरशः दोन तुकडे होऊन गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत तेथील मंदिर संस्थानचे महाराज व कर्मचारी आणि दुकानदारांना आढळून आली असून,सध्या तेच या पाय मोडलेल्या गाईस चारा-पाण्याची व्यवस्था करत आहेत.
गंभीर जखमी गाय कुठली आहे? याबद्दल त्यांनी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता सदरील गाय ही वनदेव मठ संस्थानची असून व तेथील गाई मोकाट सोडण्यात येत आहेत.जखमी गाईचे वैद्यकीय ईलाजावर खर्च करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.
सदरील गाईचे ऑपरेशन शस्त्रक्रिया करून पाय कट करावं लागणार आहे. तरि गो-शाळा वाले तीला घेऊन जायला सुद्धा तयार नाही.
माहूरचे काही गोरक्षक पैसे खर्च करून ईलाज करायला तयार आहेत पण तीची ऑपरेशन नंतर काळजी कोण घेणार व एका गोशाळेची गाय इतर कोणाला काळजी घ्यायला ताब्यात कशे द्यावी? असा यक्षप्रश्न अनुसया माता मंदिर येथे सध्या जखमी गाईचे चारा-पाणी करणार्यांसमोर उपस्थित होत आहे. गेल्या पंधरा दीवसांपासून अनुसया माते वरचे कर्मचारी व दुकानदार तीचे चारा पाणी करत आहेत.अशी माहिती दत्त शिखर येथील मुख्य पुजारी चिंतामणी भारती गुरु धनराज भारती महाराज यांनी दिली आहे.
हिंदू धर्मात गाय हे पवित्रतेचे, संपन्नतेचे, मांगल्याचे प्रतीक आहे. हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासूनच गाईला महत्त्वाचे स्थान आहे.
गोमूत्राला देखील विशेष धार्मिक व वैद्यकीय महत्त्व आहे. गोमय (गाईचे शेण), गोमूत्र (गाईचे मूत्र), गाईचे दूध, दही, तूप यांच्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात. जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ ‘ऋग्वेद’ आहे. त्यात गाईचे स्थान उच्च आहे असे सांगणारा एक मंत्र आहे.
माता रुद्राणां दुहिता वसूनां स्वसादित्यानां अमृतस्य नाभिः ।प्र नु वोचं चिकितुषे जनाय मा गां अनागां आदितिं वधिष्ट IIयात प्रत्येक विचारशील पुरुषास निर्देश केला आहे की, तुम्ही गाईस माता, बहीण व कन्या या समान समजा. त्यांना केव्हाही मारू नका. गाय निर्दोष व निरपराध आहे.हा मंत्र वैदिक काळात गाईचे स्थान उच्च कोटीचे असल्याचे दर्शवितो.
अथर्ववेदातील ११-१-३४ हा मंत्र म्हणतो की, ‘धेनुः संदनं रयीणाम्’ अर्थात गाय साऱ्या संपत्तीचे भांडार आहे.
आता प्रश्न उपस्थित होत आहे की,ही पाय मोडलेल्या अवस्थेतील गाय नेमकी कुठली व कोणाची? मोकाट सोडण्याचे व पाय मोडण्याचे कारण काय❓ ज्यांची ही गाय असेल त्यांनी ती घेऊन जावी व तिच्या मोडलेल्या पायाची शस्त्रक्रिया करून ईलाज करून ह्या मुक्या प्राण्याच्या जीव वाचवून पुण्य कमवावे असे आवाहन चिंतामणी भारती महाराज यांनी केले आहे.
आत्ताच प्राप्त ताज्या माहिती नुसार
वनदेव येथील दत्ता पुरी महाराज यांनी मोकाट सोडलेल्या गाईचा अपघात होऊन पंधरा दिवस झालेत . त्यांना सुचीत करूनसुद्धा प्रतीसाद मीळत नसल्याने अखेर काही गोरक्षकांनी पुढाकार घेउन दत्त शीखर संस्थानचा गोशाळेत सदरील गाईस हलवीले असून,त्याठिकाणी तीच्यावर प़शुवैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष दांडेगावकर यांच्या टीमने ईंफेक्शन पसरलेला पाय कापून काढून गाईला जीवनदान दीले आहे.*