मान्यवरांच्या मांदियाळीने दुमदुमणार माहूर शहर
माहूर तालुका प्रतिनिधी/विजयसिंह हजारी
माहूर – संपूर्ण महाराष्ट्रात संत बाळगीर महाराज स्वच्छता अभियान राबवणारे राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज यांनी दिनांक 9ते 10मे 2024पर्यंत दोन दिवसीय विद्यार्थी शिक्षण परिषद व पालक विद्यार्थी मेळावा सद्गुरू दत्ता महाराज यांच्या प्रेरणेने आयोजित केला आहे.या निमित्ताने परिसरातील हजारो विद्यार्थी व पालक त्याचा लाभ घेणार असून, या स्तुत्य उपक्रमाचे तमाम महाराष्ट्रभर कौतुक होत आहे.
दिनांक 9मे 2024 रोजीगुरुवारी सकाळी सहा वाजता पवित्र माहूर नगरीत ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.शहर दिंडीनंतर लगेचच उद्घाटक नगराध्यक्ष फिरोज दोसानी, तहसीलदार किशोर यादव,
स.पो.नि.शिवप्रकाश मुळे,जेष्ठ पत्रकार नंदकुमार संतान यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.
याच दिवशी दुपारी दोन वाजता गटशिक्षणाधिकारी राजु मुधोळकर,
जेष्ठ पत्रकार विजय आमले व नंदकुमार जोशी,मु्अ.थोरवे सर या शिक्षण परिषदेचे अध्यक्ष अनिल सुरवसे,सुधिर जायभाई,भाग्यवान भवरेसर,विजय घाटे, नागोराव डोंगरे हे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत.
दि. 10मे शुक्रवारी सकाळी 9ते2वाजेपर्यंत तज्ञ मंडळी विद्यार्थ्यांना उद्बोबोधित करणार आहेत.त्यांनंतर लगेचच तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सरफराज दोसानी,
कृ.उ.बा.समितीचे सभापती दत्तराव मोहिते,वानोळे गुरुजी,गोल्ला गोल्लेवार संघटणेचे प्रदेश अध्यक्ष भुमन्ना आकमवाड, जिल्हाध्यक्ष बद्दिवाड,छ.संभाजीनगरचे बबनराव जगाडे तसेच रमेश मुनेश्वर ,शेषेराव पाटील, मिलींद कंधारे,भरत ठाकरे हे गुरुवर्य सदरील शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत.सायंकाळी पाच वाजता समारोप शिबिरात जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे,प्रा.विठ्ठल कांगणे परभणी ,शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, शिक्षणाधिकारी माधव सलगरे,व दिलीप वानखेडे हे मान्यवर सांगता प्रसंगी सखोल मार्गदर्शन करणार असल्याने शिक्षणप्रेमी पालकत्व विद्यार्थ्यांनी या सामाजिक उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रसंत द.भ.प. साईनाथ महाराज वसमतकर यांनी आनंद दत्तधाम आश्रम श्रीक्षेत्र माहूर येथुन केले आहे.