वसंतराव चव्हाण यांची राहुल गांधी यांच्याकडून प्रशंसा !

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते खा. राहुल गांधी हे रविवारी तेलंगना राज्याच्या दौऱ्यावर जात असताना नांदेड येथील विमानतळावर दुपारी १२ वा. विशेष विमानाने त्यांचे आगमन झाले.यावेळी त्यांच्या स्वागतासाठी वसंतराव चव्हाण विमानतळावर गेले असता *वसंतराव,तुम्हारी हवा दिल्लीतक चल रही है…* असे तर म्हटले नसावे,अशी चर्चा जिल्ह्यात होत आहे. 

यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष बी.आर.कदम, ईश्वरराव भोसीकर,हनमंतराव पाटील बेटमोगरेकर,शहराध्यक्ष अब्दुल सत्तार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.रविवारी दुपारी राहुल गांधी हे निर्मल व आदिलाबाद येथील निवडणूक प्रचारसभेसाठी आले होते.या ठिकाणाहून हेलिकॉप्टरने ते निर्मलकडे रवाना झाले.जिल्हा काँग्रेस कमिटीकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. माजी आ.वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारासाठी

दिल्लीहून काँग्रेसचा एकही मोठा नेता आला नव्हता.त्यांच्या पश्चात वसंतरावांनी एकाकी किल्ला लढविला.यावेळी त्यांच्यासोबत केवळ आ.अमित देशमुख व धीरज देशमुख या दोघांनी त्यांना विशेष साथ दिली. त्याचप्रमाणे नाना पटोले यांनीदेखील वसंतरावांच्या विजयासाठी प्रयत्न केलो.राहुल गांधी आणि वसंतराव चव्हाण यांचा परिचय नव्हता.शहर अध्यक्ष अब्दुल सत्तार व नांदेड जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष बी.आर.कदम यांनी त्यांचा परिचय करून दिला.यावेळी राहुल गांधी यांनी त्यांची प्रशंसा करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.

Share This Article
error: Content is protected !!