विना नंबर प्लेट तसेचअनफिट टिप्पराचा समावेश
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – जिल्यातील बिलोली,मुखेड,देगलूर,धर्माबादेत पोलिस व महसुल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाळुच्या भुरट्या चोरट्यांनी हायवा,टिप्पर,ट्रॅक्टर, ट्रक,या वाहनातून वाळु व मुरुम चोरुन वाहतुक करत असल्याचे पहावयास मिळत असुन दिवस उजाडल्यावर शहरात बांधकाम होत असलेल्या ठिकाणी वाळुचे ढिगारे पहावयास मिळत आहे.
हायवा,टिप्पर,ट्रॅक्टर, ट्रक,या वाळु व मुरुम चोरांच्या वाहनांना एक तर नंबर प्लेट नाहित,असतील तर बनावट आहेत शिवाय सदरिल वाहने हि आरटिओ नियमा नुसार अनफिट असल्याची सत्यता समोर आली आहे.परंतु निर्ढावलेल्या पोलिस तसेच महसुल प्रशासना कडुन कोणतीच कार्यवाही होत नाहि शिवाय वाळुचे भुरटेचोर, पोलिस व महसुल प्रशासन यांची रात्रीची शपतविधी दररोज होत असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांचे म्हणने आहे.रात्री अकरा वाजेपासुन सकाळी पाच वाजे पर्यंत सदरिल गोरखधंदा जोरदार पणे सुरू आहे. यात बाळापुर येथील तिन वेगवेगळ्या पक्षाचे राजकिय वरद हस्त असलेले व एक अराजकीय व्यक्ती असल्याचे बोलले जात आहे.
शहरातील महाभाग दिवसा कडक पांढरे कपडे घालुन चकाचक फिरत असले तरी रात्री मात्र त्यांची ईमेज केवळ भुरटे वाळु व मुरम चोरट्याची आहे.देश किंवा राज्य पातळीवर या कार्यकर्त्यांच्या आपापल्या पक्षाचे जमत नसले तरी चो-या करण्यासाठी मात्र हे लोकं रात्रीच्या वेळी मुरम व वाळु चोरीसाठी मोटार सायकलवर ट्रिपलसिट फिरताना त्यांना अनेक लोकांनी पाहिले आहे.
महसुली वरीष्ठ उच्चस्तरीय स्तरांकडुन धर्माबाद तालुक्यात अधिकृत वाळु घाट नसताना धर्माबाद ग्रामीण भागातील तसेच शहरातील वाळु चोरट्यांनी हायवा,टिप्पर,ट्रॅक्टरच्या,ट्रक, माध्यमातून रात्री अपरात्री रेती उपसा करून धर्माबाद शहरात व ईतर भागात विक्री सुरू केलेली आहे. या विषयी महसूल व पोलीस प्रशासनाने कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे.
रात्रीला वाळु चोरट्यांना पकडण्याची धाडसी कार्यवाही होईल हे शक्यच नसल्याचे चर्चेला उधान आले आहे. धर्माबाद शहरातील पोलिस प्रशासनची दुर्लक्ष प्रवृत्तीमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
वाळु चोरट्यांना वाळु उपसा आणि विक्री करण्यासाठी रात्रीला पुर्णपणे मोकळीकता आणि प्रशासना समोरुन सदरील वाहने जाताना कार्यवाही न होता अर्थोअर्थी दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. असे प्रकार प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्न चिन्ह निर्माण करत असल्याचे सर्वसामान्याचे म्हणने आहे.
संबंधित प्रशासकिय अधिकारी यांच्या चुप्पी विषयी धर्माबाद शहरांत उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.सदरिल प्रकाराविषयी जिल्हा पोलिस अधीक्षक आणि जिल्हा अधिकारी यांनी दखल घेऊन वाळू चोरट्यांचा आणि त्यांना पाठबळ देणाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करण्याची मागणी जनतेतुन होत आहे.
या प्रकरणी पोलिस प्रशासनाने कोंबीग आपरेशन राबवणे आवश्यक असले तरी वाळु चोरट्या कडुन मिळत असलेली चिरीमीरी मुळे धर्माबाद पोलिस हे करु शकणार नसल्याचे पहावयास मिळते.