जारच्या पाण्यातील क्लोरीन नावाच्या रसायन मुळे अनेकांच्या तोंडाची चव गायब
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – जिल्ह्यातील अन्न व भेसळ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यात अनेक थंड पेय कोल्ड्रिंक,थंड बाॅटल पाणी व जारच्या पाण्यामुळे नागरिकांना घशाचे आजार ऊदभवत आसल्याचे प्रकार समोर येत असुन शरीरातील पेशींचे प्रमाण कमी होऊन आणेकांना अचानक भुरळ येण्याच्या प्रकारात वाढ झाल्याचे पहावयास मिळत आहे.
गेल्या काही महिन्यापासून सध्या नांदेड जिल्ह्यामध्ये उन्हाळ्याचे दिवस असल्याने उन्हाचा पारा देशातील दहा शहरांत नांदेड पहिल्या क्रमांकचे शहर होते. उन्हाच्या वाढत्या तापमानमुळे नागरिक थंडगार बाॅटल पाणी व कोड्रिंग पिण्यासाठी हॉटेल,रसावंती,मध्ये जातात मात्र तेथील कोल्ड्रिंक,थंड बाॅटल पाणी व जारच्या थंड पाण्यामुळे अनेक नागरिकांना घशाचे व शरीरातील कफ,लाल पेशी पांढऱ्या पेशी,चे प्रमाण कमी जास्त होण्याच्या प्रमाणात वाढ होत असून त्यामुळे वयोवृद्धाच्या व तरुणांच्या शरीरात थकवा येण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे असे आजर फक्त जारचे पाणी शुद्ध करण्यासाठी वापरले जाणारे केमिकल रसायन मुळे उद्भवत असल्याचे बोलले जात आहे ,याकडे अन्न भेसळ अधिकारी मात्र डोळेझाक करून गप्प बसल्याने जिल्ह्यामध्ये चर्चेला उधाण आले आहे.
अनेकांना जार चे पाणी पिल्याने तोंडातील विशिष्ट प्रकारे वास आल्याचे जाणवत असून या पाण्यामुळे शरीरातील तांबड्या व पांढऱ्या पेशी चे प्रमाण कमी होताना देखील जानवत आहे.
तर दुसरीकडे उन्हाचा पारा वाढत असल्याने जारचे पाणी वारंवार पिल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याचे देखील बोलले जात आहे.
याकडे तात्काळ अन्न भेसळ अधिकारी यांनी लक्ष देऊन अस्या चाललेल्या गोरधंद्याकडे लक्ष द्यावे व तातडीने पाण्याचे नमुने तपासणीसाठी लॅबला पाठवण्यात यावे,जेणेकरून यापुढे होणारे आजार हे रोखण्यास मदत होईल अशी अपेक्षा सर्व सामान्य जनातुन व्येक्त केली जात आहे.