अधिकाऱ्यांच्या हलग्रजी पणा मुळे शेतकऱ्यांचे नुकसान
शासनाकडून नुकसान भरपाई मिळून देण्यास प्रेयत्न करणार.. तसीलदार अंदेश्वार
नांदेड : जिल्यातील धर्माबाद तालुक्या मधील अप्पर पैनगंगेच्या कालव्याची महत्वाकांक्षी योजना धर्माबाद तालुक्यांत अर्धवट असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना पहिल्याच पावसात बसला आहे.
त्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील बन्नाळी येथील अर्धवट बांधकाम केलेल्या कालव्यामुळे शिवारातील पिकांना मोठा फटका बसला असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.कालव्याच्या बाजूला असलेल्या गट नंबर १९६ मध्ये प्रवीण मारोतीराव पाटील,अरविंद मारोतीराव पाटील,नवीनकुमार मारोतीराव पाटील,या तीन भावांची २३ एकर जमीन आहे सदरील अर्धवट कालव्यामुळे प्रत्येक भावाचे एक ते दीड एकरात शेतीचे नुकसान पाण्यामुळे झाले आहे.
अशा घटना धर्माबाद तालुक्यात अपूर्ण असलेल्या अप्पर पैनगंगा कालव्यामुळे तालुक्याच्या शिवारात अनेक ठिकाणी घडलेल्या असल्याचे ऐकण्यात येत असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळत आहे.
कालव्याच्या अर्धवट संदर्भात शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांची भेट घेऊन व्यथा मांडल्या होत्या तसेच अप्पर पैनगंगा तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली होती. की गेल्या वर्षीही आमच्या शेतीचे नुकसान झाले,कमीत कमी यावर्षी तर आमचे नुकसान होऊ देऊ नका,म्हणून विनंती केली.पण ह्या कालव्याच्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे दरवर्षी आम्हा शेतकऱ्यांना नुकसान सहन कराव लागत आहे.आता पुर्ण पावसाळा बाकी आहे.
त्यामुळे शासनाने या कामाची पाहणी करून शेतीचे नुकसान होऊ नये यासाठी कालव्याचे काम लवकरात लवकर करावे, व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी पाटील बंधुनी केली आहे.