धर्माबाद तालुक्यात जलजिवन योजनेचा बट्ट्याबोळ

abhishek bakkewad
4 Min Read
Spread the love

 

जिल्यातील प्रत्येक गावातील परिस्थिती सारखीच

निकृष्ट दर्जाचे पाईप, जुन्या योजनेचे कामे दाखवून निधी हडप केले जाते गावकऱ्यांतुन आरोप 

अधिकारी व गुत्तेदार यांचीच दिवाळी

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – ग्रामीण भागात पाणी टंचाई भासू नये,शुद्ध पाणी मिळावे, हर घर नळ या माध्यमातून केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने जलजिवन योजना अंतर्गत जिल्हा परिषद मार्फत धर्माबाद तालुक्यात कोठ्यावधी रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहे.पण ही कामे तालुक्यात प्रत्यक्षात पाहिले तर गुत्तेदार व संबंधित अधिकारी यांचीच दिवाळी होत असल्याचे दिसून येते या योजनाचे काम निकृष्ट दर्जाचे,जुन्ने पाईप,तेही निकृष्ट दर्जाचे काही महिण्यात फुटतील असे पाइपलाइन एवढेंच नसुन 

 

 जुन्या योजनेवचे कामे दाखवून ,नविन काम केले म्हणून नविनचा खर्च दाखवून हडप केले जात असल्याचा आरोप गावकऱ्यांतुन होत आहे.तालुक्यात या योजनेचा बट्ट्याबोळ होत असुन.ही योजना केवळ अधिकारी व गुत्तेदार यांना पोसण्यासाठीच असावी अशी संताप जनक प्रतिक्रिया उमटत आहे.कोठ्यावधी रुपये खर्च,या योजनेवर होत असुन आणखी बहुतांश गावात ऐन उन्हाळ्यात नळाला थेंब भरही पाणी नाही. धर्माबाद तालुक्यातील चाळीस गावात जलजिवन योजना सन २०२२ रोजी मंजूर झाली असून विस कोटी रुपयेचे कामे करण्यात येतं आहे.

ही कामे जिल्हा परिषद अंतर्गत पाणीपुरवठा विभाग करीत आहे. तालुक्यात सन २००७-८ व सन २०१०- ११ मध्ये स्वजलधारा व पेयजल योजना पंचवीस गावात मंजुर झाले होते.यात एका एका गावांना चाळीस चाळीस लाख रुपयेचा निधी गावपातळीवर पाणीपुरवठा समितीवर वर्ग करण्यात आला होता.त्याकाळातील सूध्दा ही योजना पुर्णत्वास आली नाही.कुठे विहीर खोदली तर,गावात पाणी टाकी बांधली नाही, कूठे पाणी टाकी बांधली तर पाइपलाइन केली नाही,कुठे पाइपलाइन केली तर गावातील नळाचे पाईपलाईन केले नाही असा भोंगळ कारभार त्या काळात झाला.व एकही गावाला नळाद्वारे पाणी मिळाले नाही, पाण्यासाठी आलेला निधी गुत्तेदार व अधिकारी यांच्या मिलीभगत मुळे पाण्याचा पैसा पाण्यातच गेला पण नागरीकांना काही पाणी मिळाले नाही. तेव्हाचेच काम पुर्णत्वास झाले नाही,तर या योजनेतील उर्वरित निधी गेला कुठे? असा प्रश्न पडला आहे.पुर्विचेचपेयजल व स्वजलधारा योजनेचे कामे जैसे थे पडुन असुन या योजनेचा निधी हडप झाला असल्याचे गावकऱ्यांतुन होत आहे.

त्यानंतर पुन्हा सरकारने सन २०२२ मध्ये जलजिवन योजना सुरू केली असून हर घर में नळ या माध्यमातून धर्माबाद तालुक्यातील चाळीस गावात विस कोटी रुपयेचा निधी मंजूर झाला.सध्या गावागावात कामे चालू आहेत.पुर्वीच्या योजना पेक्षा जास्तीने निधी आला आहे. काही गावात एक कोटी,कुठे दिड कोटी असे मंजूर झाले आहे.पण अधिकारी व गुत्तेदार यांचा मनमानी कारभार चालत असुन. सन २००७-८ व २०१०-११ मध्ये झालेल्या जुन्या विहीरीवर काम करुन,नवीन विहीर खोदले आहे.

 असे दाखविले जात आहे तर जुन्नी पाईपलाईनवर काम करुन नवीन पाईप लाईन केले आहे असे दाखवून,त्यावरील खर्च दाखवून पैसे हडप केले जात असल्याचे धक्कादायक प्रकार जलजिवन योजनेत होत आहे.जलजिवन योजनेत कामे तर निकृष्ट दर्जा पाईप,इतर साहित्य निकृष्ट दर्जाचे व जुन्या योजनेवर कामे केले जात आहे.धर्माबाद तालुक्यात जलजिवन योजनेचा बट्ट्याबोळ होत असल्याचा आरोप होत आहे.

 

कोठ्यावधी रुपये खर्च करून गावाला पाणी पुरवठा होत नसल्याने गावकऱ्यांत संताप व्यक्त होत आहे. धर्माबाद तालुक्यातील चाळीस गावातील जलजिवन योजनाची जिल्हा मुख्यकार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून चौकशी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Share This Article
error: Content is protected !!