नांदेड प्रतिनिधी /अशोक वाघमारे
नांदेड – दि.१० मे मुदखेड कडून येळी कडे येणारी एक क्रूजर गाडी भरधाव वेगाने येळीच्या पुलावरून गोदावरी नदीमध्ये कोसळल्यामुळे पाण्यात बुडून गाडीच्या चालकासह अन्य एक जणांचा मृत्यू झाल्याची घटना दि.१० मे रोजी सायंकाळी लोहा तालुक्यातील येळी येथे घडली. ही माहिती समजतात येळी, महाटी, चिलपिंपरी या गावातील लोकांनी खूप गर्दी बघण्यासाठी केली होती.
मुदखेड कडून महाटी मार्गे ही गाडी येत असताना येळी येथील पुला जवळ गाडी आल्याने वेगात असलेल्या गाडीचे नियंत्रण चालकाच्या हातून सुटले व ही गाडी थेट गोदावरी नदीत जाऊन कोसळली या गाडीत असलेले उद्धव आनंदा खानसोळे (वय ३२)रा. शिखाची वाडी ता. मुदखेड आणि थोराजी मारोती ढगे (वय २२) रा. येळी ता.लोहा यांचा पाण्यात बुडवून मृत्यू झाला. या घटनेची माहिती गावकऱ्यांना समजताच बोटीच्या सहाय्याने दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर करण्यात आले.
यावेळी घटनास्थळी उस्माननगर सह मुदखेड येथील पोलीस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले व दोन्ही शव उत्तरिय तपासणीसाठी उस्मान नगर व मुदखेड येथील शासकीय दवाखान्यात पाठवण्यात आले. या घटनेबाबत अद्याप तरी गुन्हा दाखल झालेला नव्हता. या घटनेतील थोराजी ढगे हा अविवाहित असून त्यांचा मृतदेह पाहताच त्यांच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे.
यावेळी मुदखेडचे पोलीस निरीक्षक सप्रे, उस्मान नगर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार उपनिरीक्षक गाडेकर, शिवराज ढगे येळी, महाटी, चिलपिंपरी गावातील नागरिकांनी मदत केली.